Indapur News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्ता भरणे यांच्या प्रचारार्थ इंदारपूरमधील निमागांव केतकी येथे सभा घेतली, यावेळी आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. त्या सर्वांचे स्वागत करताना अजित पवारांनी जयंत पाटलांना टोलाही लगावला.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 'अनेकांनी इथे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. आप्पासाहेब जगदाळेंबरोबर अनेकांनी पक्षात प्रवेश केला हे मी जाहीर करतो. आपली विचार सरणी फार वेगळी नाही. मागील काही काळात आपल्यात अंतर पडले होते. आज आपण योग्य निर्णय घेतला आप्पासाहेबांना धन्यवाद. जयंत पाटलाला वाटले असेल कशाला मी इथे 'तुतारी'चा उमेदवार दिला आप्पासाहेबांना दिलं असतं तर बर झालं असतं. सत्ता येते जाते पण जनतेची कामे झाली झाली पाहिजेत. इथे आल्यावर अनेकांच्या आठवणी येतात. तोलामोलाची माणसं निमगांव केतकीने जिल्हाला दिली हे विसरता येत नाही.'
तसेच 'कालपासून सर्व राजकीय पक्ष युती आघाड्या आम्ही कसे योग्य सांगण्याचा प्रयत्न करतात. इंदापूरच्या इतिहासात ६००० कोटी रुपये आले. इंदापूर तालुका कुठे मागे राहता कामा नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केला. शंभर टक्के समाधान कोणाचं करता येत नाही, काम करणं हे आपलं कर्तव्य असतं. आपला पक्ष कसा मजबूत होईल, ताकद कशी मिळेल मोठा कसा होईल हे आम्ही पाहत असतो. आप्पासाहेब जगदाळेंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) ढाण्या वाघ आलेला आहे. इंदापूर तालुक्यातील संस्थांबाबत मी परवा सुतोवाच केलं पण त्यात माझा दुसरा हेतू नाही, पण संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत.' असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.
याशिवाय 'राष्ट्रवादीला ज्या जागा मिळाल्या त्यात दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या. इतरही समाजाला जागा दिल्या. ओठात एक आणि पोटात एक अशी तर वृत्ती अजित पवारची नाही ना. आप्पासाहेब जगदाळेंमुळे इंदापूरात पक्षाची ताकद वाढली आहे. पण गाफील राहू नका समोरचे उमेदवार तुल्यबळ आहेत असे समजून आराखडे बांधा. मतदाराला गृहित धरण्याचं कारण नाही. राज्य कोणाच्या हातात द्यायचं याचा अधिकार घटनेने त्यांना दिला आहे.'
तसेच 'कांद्या बाबात आम्ही योग्य निर्णय घेतले आहेत. वेळ पडली तर दिल्लीतील नेत्यांना कामे सांगायला काही वाटत नाही. काहीजण सांगतात आपले महाराष्ट्रातले उद्योग पर राज्यात चालले हे धादांत खोटं आहे. गुजरातला प्रकल्प पळून चाललेत असं नाही, देशात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. महत्वाच्या पदावर बसलेल्या माणसाला आपलं राज्य पाहुन चालत नाही, त्याला देश पाहावा लागतो. काही लोक मुद्दाम हे बोलत आहेत.' असं यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवलं.
तसेच 'संघटना कोणा एका मालकीची नसते हे लक्षात घ्या. राज ठाकरे (Raj Thackeray) कधी काय बोलतील काय सांगता येत नाही त्या गोष्टीला महत्व देऊ नका. वीज मोफत दिली आहे ते आउटघटकेचे नाही. मी अनेक वर्ष अर्थमंत्री आहे त्यातलं मला थोडंबहुत ज्ञान आहे. नीरा भीमा नदीवरील बंधारे दुरुस्त केले जातील. बावीस गावची माणसं काळजी करु नका आम्ही कामाची माणसं आहोत. सारखं दल बदलू करणारी आम्ही नाहीत.' असं अजित पवार म्हणाले.त
तर 'आप्पासाहेबांचा मान सन्मान ठेवण्याची जबाबदारी मी उचलली आहे. तुम्हीच मला चार पाच वेळा उपमुख्यमंत्री पदावर बसवलं आहे. कोराना काळात टाटा कंपनीने दीड हजार करोड रुपये सीएसआर दिला होता. राहिलेल्या दिवसांत प्रचाराची यंत्रणा राबवताना हलगर्जीपणा करु नका. बोलतो तसा वागणारा अजित पवारचं आहे हे आप्पासाहेबांच्या मनात आलं. संस्था,बँक,साखर कारखाने जे अडचणीत आले आहेत त्यातून आपल्याला वाट काढायची आहे. यात केंद्राची मदत लागेल. नव्या जुन्यांचा नीट मिलाफ होऊन काम करू, आलेल्या सर्वांना वा-यावर सोडणार नाही.' असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.