Ajit Pawar Eknath Shinde sarkarnama
पुणे

Pune Politics: अजितदादा-एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच; दोन माजी आमदार कुणाच्या गळाला लागणार?

Ravindra Dhangekar Mahadev Babar to join ncp or Shiv Sena:काँग्रेस अन् ठाकरे गटातील नाराज नेत्यांचे पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी शिवसेनेचे रणनीती आखली आहे.

Mangesh Mahale

Pune News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टॉयगरला उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रेक्र लावणार का, अशी चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. पुण्यातील दोन माजी आमदारांनी काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, पण या दोन्ही आमदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खुली ऑफर दिली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. हे दोन्ही नेते शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरु झाली. पण आता या बाबर आणि धंगेकर यांना राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याने ते काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील नेते शिंदेंच्या सेनेत घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. पुण्यातही शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी 'मिशन पुणे' लाँच केले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटात नाराज असलेल्या नेत्यांवर शिंदे सेनेचा डोळा आहे.

काँग्रेसमधील काही नेतेही शिवसेनेच्या गळाला लागतील अशी चर्चा आहे. काँग्रेस अन् ठाकरे गटातील नाराज नेत्यांचे पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी शिवसेनेचे रणनीती आखली आहे. अशा परिस्थितीत मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून शिंदेंच्या 'मिशन पुणे'ला आव्हान देण्यात येत आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेत्यांना गळाला लावण्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवेसेने रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र पुण्यात आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, शिवसेनेचा प्रवेशाची शक्यता धंगेकर यांनी फेटाळून लावली आहे. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.

धंगेकर यांच्या सारखा काम करणारा, सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याने, लोकप्रतिनिधीने नक्की एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती करते, असे रुपाली पाटलांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT