Ajit Pawar : Chandrakant Patil  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Vs Chandrakant Patil : झेंडावंदनाची लढाई अजितदादांनी जिंकली; पुण्याच्या पालकमंत्र्यांना पाठविले रायगडात, स्वत: मात्र कोल्हापुरात!

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महायुती सरकारमधील सुप्त संघर्ष आणि रस्सीखेच झेंडावंदनावरून समोर आली होती. अखेर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या प्रश्नावर बैठक घेऊन, तोडगा काढावा लागला आहे. त्यात किमान पुणे जिल्ह्यात तरी अजित पवार हे चंद्र्कांत पाटील यांना भारी पडलेले दिसून आले. (Latest Marathi News)

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात कुठल्या मंत्र्याने झेंडावंदन करायचा यात तीनच दिवसांत काल (ता.११) पुन्हा एकमेव बदल करण्यात आला. त्यानुसार पालकमंत्री असूनही पुण्यात चंद्रकांतदादा ते करणार नाहीत. त्यांना त्यासाठी घाटाखाली रायगडला पाठवण्यात आले आहे.

दुसरीकडे अजितदादा, हे मात्र चंद्रकांतदादांच्या कोल्हापूरात जाऊन ध्वजवंदन करणार आहेत. त्यातून त्यांनी झेंडावंदनाची लढाई जिंकल्याची चर्चा सुरु झाली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा होण्याचा पहिला टप्पाही त्यांनी यातून पार केला, असून तिसऱ्या व अखेरच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर तेच पुन्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील,अशी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा दोन जुलैला दुसरा विस्तार झाला. त्यामुळे जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांत होणारा फेरबदल सव्वा महिन्यानंतरही अद्याप झाला नव्हता. यामुळे १५ ऑगस्टला कोणत्या मंत्र्याने कुठे झेंडावंदन करायचे हा पेच निर्माण झाला. युतीतील तिन्ही पक्षांत कुरबुरी व सुप्त संघर्ष पेटला. त्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा सावळागोंधळ असलेले हे गम्मत-जम्मत सरकार असल्याचा उपहासात्मक टीका केली होती.

राज्य मंत्रीमंडळात नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री आणि अगोदरच्या भाजप-शिवसेनेच्या वीस मंत्र्यांनी ध्वजवंदनाचा प्रश्न आपल्या प्रतिष्ठेचा केला होता. रायगड,पुण्यासारख्या ठिकाणी त्याला आणखी तीव्र स्वरुप आले होते. त्यामुळे ८ तारखेच्या जीआरमध्ये सर्व २८ मंत्र्यांना ध्वजवंदनाचा सन्मान देण्यात आला होता. त्यानुसार पुण्यात हा मान चंद्रकांतदादांना देण्यात आला होता. काल त्यात पुन्हा बदल करण्यात आला.

या बदलानुसार चंद्रकांतदादा हे आता रायगड जिल्ह्यात झेंडावंदन करणार आहेत. तर, पुण्यात राज्यपाल रमेश बैस ते करतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रालयात, उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूरात, तर सहा जिल्ह्यात तेथील जिल्हाधिकाऱ्यांना हा मान देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT