Nawab Malik Bail : 'अजित पवार भाजपसोबत गेल्यानेच नवाब मलिकांना जामीन ?' राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने म्हंटलं..

Supreme Court Grants Bail To Former Maharashtra Minister Nawab Malik : आम्हाला खात्री आहे की, नवाबभाईंची निर्दोष सुटका होईल."
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मिळाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून याचे स्वागत करण्यात आले. नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात अटकेत होते. शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, "पक्ष नवाब मलिक यांचे मनापासून स्वागत करतो. आम्ही त्यांच्या परतण्याची प्रतीक्षा करत होतो. अखेर त्यांना जामीन मिळाला." (Latest marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar - Chandrakant Patil : अजितदादा -चंद्रकांतदादांमध्ये 'पुण्या'साठी चढाओढ, दोन दिवसांत स्वतंत्र बैठकांचा धडाका

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप सोबत सत्तेत सामील झाल्यानेच नवाब मलिक यांना जामीन मिळाले, अशी चर्चा होत होती. यावर अजित पवार गटाचे नेते नरेंद्र राणे म्हणाले, "भाजपसोबत सत्तेत आलो म्हणून नवाब मलिक यांना जामीन मिळाला, असे म्हणणे चुकीचे आहे. मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवाबभाई कोणतीही चूक करू शकत नाहीत, यावर आमचा नेहमीच विश्वास आहे. त्यांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. आम्हाला खात्री आहे की, नवाबभाईंची निर्दोष सुटका होईल."

Ajit Pawar
Nawab Malik Bail : नवाब मलिकांचं राजकारण फिरणार; पवारसाहेब की अजितदादांच्या नव्या समीकरणात सामील होणार?

अजित पवारांसोबत नवाब मलिक येणार?

नवाब मलिक आता अजित पवार गटात जाणार का? यावर राणे म्हणाले, "मलिक यांनी अजितदादांना अद्याप पाठिंबा जाहीर केलेला नाही, मात्र सर्वांना माहिती आहे की, मलिकांनी नेहमीच अजितदादांशी चांगले संबंध ठेवले आहेत. नवाबभाई बाहेर आले की, ते ठरवतील. मात्र त्यांचे भाऊ आणि मुलगी आपापल्या भागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमच्या पक्ष कार्यालयात नेहमी येत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com