Ajitdada praised Shah : अमित शहांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर अधिक प्रेम; अजितदादांनी कारण सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला

Cooperative Ministry's Program : अजितदादांनी त्याचे कारण तर ऐका असे उपस्थितींना ऐकवले. त्यावेळी अमित शहा यांच्या सर्वांनी हसून दाद दिली
Amit Shah_Ajit Pawar
Amit Shah_Ajit PawarSarkarnama

Pune News : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे गुजरातमधून येतात. मात्र, त्यांचे प्रेम महाराष्ट्रावर अधिक आहे. (तेवढ्यात उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि अजितदादांनी त्याचे कारण तर ऐका असे उपस्थितींना ऐकवले. त्यावेळी अमित शहा यांच्या सर्वांनी हसून दाद दिली) कारण ते महाराष्ट्राचे जावई आहेत. कोणी माना किंवा न माना; पण प्रत्येक जावयाचे सासूरवाडीवर थोडे जादा प्रेम असते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहांचे कौतुक केले. (Amit Shah loves Maharashtra more than Gujarat: Ajit Pawar)

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी' या पोर्टलचे उद्‌घाटन पिंपरी चिंचवड येथे आज करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Amit Shah_Ajit Pawar
Ichalkaranji News : इचलकरंजीसाठी मोठी बातमी; मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष,कागलमधील नेत्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकारातून समृद्धी’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा प्रयत्न करीत आहेत. त्यांना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून आमची संपूर्ण साथ असेल. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये एकेकाळी एकच होती आणि दोन्ही राज्यांचा सहकार क्षेत्राचा इतिहास हा गौरवशाली असाच राहिला आहे. केंद्र सरकारने उचलेल्या अनेक पावलांमुळे सहकार क्षेत्रात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल.

Amit Shah_Ajit Pawar
Ajit Pawar Group News : शरद पवार गटातील एक बडा नेता अजितदादांसोबत जाणार; लवकरच मंत्रिपदाची शपथ घेणार...

महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश हे सर्वाधिक ऊस उत्पादक राज्ये आहेत. मात्र, उसाला एफआरपीपेक्षा जास्त भाव देणाऱ्या साखर कारखान्यांना प्राप्तीकर विभागाने नोटीसा पाठविल्या होत्या. साखर कारखान्यांना लावण्यात आलेला तो रद्द करण्यात यावा, यासाठी आम्ही २२ वर्षे प्रयत्न करत होतो. मी तर अनेक शिष्टमंडळाच्या माध्यमातून विविध अर्थमंत्र्यांना जाऊन भेटलो. देशभरातील साखर कारखान्यांवर १२ हजार ते १५ हजार कोटी रुपये प्राप्तीकर भरण्याची वेळ आली होती. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सात ते साडेसात हजार कोटी रुपये भरण्यासंदर्भात प्राप्तीकर विभागाकडून नोटिसा येत होत्या. तो कर माफ व्हावा, यासाठी आम्ही अनेकदा दिल्लीवाऱ्या केल्या. मात्र, त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही, असे अजित पवार यांनी नमूद केले.

Amit Shah_Ajit Pawar
Sharad Pawar News : यशवंतराव चव्हाण यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली होती; पवारांनी सांगितली 'ती' आठवण

उपमुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण केले. देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांनी साखर कारखान्यांचा १२ ते १५ हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याचा महाराष्ट्रासह देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. हा प्राप्तीकर माफ व्हावा, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, तो प्राप्तीकर माफ करण्याचे धाडस कोणीही दाखवले नाही. केवळ अमित शहा यांनी ते धाडसाचे पाऊल उचलले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com