Dr.Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Dr.Amol Kolhe News: अमोल कोल्हेंच्या कार्यक्रमात दादांच्या कार्यकर्त्यांची अशीही 'लगबग'

NCP News: पुणे जिल्ह्यात 'राष्ट्रवादी-एक'चे चित्र पाहायला मिळत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : क्रांतीदिनाचे औचित्य साधत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात 'रक्तदानाचा महायज्ञ' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी या 'महायज्ञा'साठी करण्यात येणारे नियोजन मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून राष्ट्रवादीमध्ये प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवर जरी दोन गट पडलेले पाहायला मिळत असले तरी ग्रामीण भागात राष्ट्रवादी एक असल्याचेच चित्र दिसत आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सध्या 'रक्तदान महायज्ञ' उपक्रम सुरू करत मतदारसंघातील गावोगावी रक्तसंकलन सुरू केले आहे. जुन्नर, खेडसह शिरुर तालुक्यातील रक्तदान अंतीम टप्प्यात असताना आता उर्वरित मतदारसंघातील नियोजनही करण्यात येणार आहे.

"राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आवर्जून या उपक्रमात सहभागी होत असून यामध्ये कोण कुठल्या गटाचा आहे, हे यामध्ये कुठेही पाहिले जात नाही", अशी प्रतिक्रिया खासदार कोल्हेंनी दिली.

जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्यात झालेल्या सर्व रक्तदानाच्या कार्यक्रमाची बहुतांश तयारी ही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेणके, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि आंबेगाव शिरुरचे आमदार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना माननारे कार्यकर्ते देखील काम करत आहेत.

आता फक्त दोन चार महिने..; वळसे पाटलांनी वाढवला सस्पेंन्स

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी आंबेगाव आणि शिरुर येथे दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सांगितले, "आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. राष्ट्रवादी हा आपलाच पक्ष आहे आणि चिन्हंही आपलेच आहे. शरद पवार तर आपले नेते आहेत. अजित पवारांनी सध्या घेतलेली पक्षीय भूमिका त्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण आता फक्त दोन चार महिने...", असे म्हणत वळसे पाटील यांनी अधिक बोलण्याचे टाळले. वळसे पाटलांनी अधिक बोलण्याचे टाळून सस्पेंन्स वाढवला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT