Jitendra Awhad  Sarkarnama
पुणे

Jitendra Awhad : आव्हाडांच्या गाडीवर हल्ला हे त्यांच्या कर्माचे फळ, अक्षय महाराज भोसलेंची टीका

Chaitanya Machale

Pune News, 02 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवर गुरुवारी दगडफेक झाली. छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आव्हाडांवर हा हल्ला करण्यात आला होता.

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले (Akshay Maharaj Bhosale) यांनी या हल्ल्याच्या समर्थन करून आव्हाडांचा कडक शब्दात समाचार घेतला आहे. 'आव्हाडांनी भूतकाळात केलेल्या कर्माची फळ आज त्यांना मिळत आहे. त्यांनी जे पेरलं ते व्याजासहित मिळत आहे'. अशा शब्दात अक्षय महाराज भोसले यांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावलं आहे.

आव्हाड यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे, ते निंदनीय आहे. युवराज संभाजीराजेंचा (Chhatrapati Sambhajiraje) अपमान तो छत्रपतींचा अपमान आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असंही अक्षय महाराज म्हणाले.

विशाळगडाच्या बाबत जी घटना घडली. त्यावर युवराज संभाजीराजे यांनी जी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे आमच्यामध्ये काही मतमतांतरे असली तरी छत्रपतींचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, हे आव्हाडांनी लक्षात ठेवावे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छत्रपतींच्या गादीचा आदर ठेवा, असे वक्तव्य केले होते. तेच शरद पवार आता खालच्या पातळीवर जाऊन छत्रपतींचा अपमान करत आहेत, त्यामुळे पवारांचं दुटप्पी वागणं असल्याचही भोसले म्हणाले.

दंगली वैगरे, नरेटिव्ह सेट व इतर शब्द वापरुन जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे नेमके काय सिद्ध करु इच्छितात? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. समाजामध्ये दुफळी पसरविण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी देखील भोसले यांनी केली.

छत्रपतींच्या गादीचे वारसदार असलेले युवराज संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची जितेंद्र आव्हाडांनी जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. ही तर सुरुवात आहे, असा इशाराही शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT