Ladki Bahin Yojana : ...त्यामुळे 2 महिन्यांनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत..., संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे अडकले आहेत. ही योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नव्या कामाला निधी देऊ नका, अशा सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
Sanjay Raut On Majhi Ladki Bahin Yojana
Sanjay Raut On Majhi Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : महायुती सरकारने जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. दोन महिन्यांनंतर या योजनेचे पैसे बहि‍णींना मिळणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सुरुवातीपासून या योजनेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. मात्र, सध्या निवडणुका (Election) असल्यामुळे पैसे मिळतील पण दोन महिन्यानंतर काहीही मिळणार नाही, लाडकी बहीण योजना ही जनतेची फसवणूक असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. ते नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यावर कर्जाचा डोंगर

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे. मात्र, दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जातोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेचे लुटलेले पैसे आहेत."

Sanjay Raut On Majhi Ladki Bahin Yojana
Ajit Pawar Politics: आमचं ठरलंय, भुजबळ आज माझ्याबरोबर नाहीत, कारण...

तसंच या योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे अडकले असल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नव्या कामाला निधी देऊ नका, अशा सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Raut On Majhi Ladki Bahin Yojana
Congress News : महायुती सरकारला जनता कंटाळली; काँग्रेसच्या नेत्याने केली टीका

कंत्राटदारांची बिल थकवली

लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील दीड कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा पहिला हप्ता महिलांना दिला जाणार आहे. तोपर्यंत सरकारी कंत्राटदारांची बिल दिली जाणार नाहीत. त्यांच्या बिलाच्या सर्व फाईल्स रोखून ठेवल्या असून बहि‍णींना ओवाळणी दिल्यानंतरच सरकार त्यांना पैसे देणार असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com