Dilip Mohite Patil- Shivajirao Aadhalrao Patil Sarkarnama
पुणे

Mahayuti News: महायुतीत 'ऑल इज नॉट वेल'; शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : महायुतीच्या सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत खेड-आळंदी (जि.पुणे) विधानसभा मतदारसंघात सारेकाही आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याचा पुन्हा प्रत्यय मंगळवारी (ता.13) आला.एकत्र संसार आहे, तर तो सुखासमाधानाने केला पाहिजे,असा टोला खेड-आळंदीचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) बेधडक आणि आक्रमक आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी स्थानिक माजी खासदार शिरुरचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांना लगावला.

राज्यातील महायुतीचे सरकार म्हणजे मुंबईतील एका छोट्याशा खोलीत दाटीवाटीने राहणारी तीन बिऱ्हाडं असून भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी एकत्र काम करतोय याचा खेद वाटत असल्याची कबुली मोहितेंनी राजगुरुनगर येथे 4 तारखेला दिली होती.खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलोत का अशी विचारणा करीत तिन्ही पक्षांचा ज्याचा त्याचा सवतासुभा आहे, असे ते म्हणाले होते.

त्यावेळी त्यांनी नाव न घेता त्यांना पुन्हा खासदारकीचे डोहाळे लागले असले,तरी ते आमच्याशिवाय पूर्ण होणार नाहीत,असे आव्हान शिवाजीराव आढळरावांना (Shivajirao Aadhalrao Patil) दिले होते. आजही त्यांनी नाव न घेता आढळरावांना पुन्हा राजगुरुनगर येथेच टार्गेट केले.

मी त्यांच्याविरुद्ध वा ते माझ्याविरुद्ध लढणार नसल्याने मग भांडायचे कशाला,असे काहीसे दोन पावले मागे येत दिलीप मोहितेंनी (Dilip Mohite) आढळरावांना एकप्रकारे मांडवलीचे आवाहन यावेळी केले.दशक्रियाविधी घाटावरील कामात शेडचा समावेश असूनही तेथे असेच शेड शिंदे शिवसेना (Shivsena) बांधणार असल्याचे समजताच त्यांनी नाराजी व्यक्त केली.सगळीकडे शेड केलं,तर कावळे आत येतील कुठून,असे ते म्हणताच उपस्थितांत हशा झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रेयबाजीसाठी असे करणे चुकीचे असून त्याऐवजी घाट बांधा,कॉंक्रीटीकरण करा,कामावर काम काढून वाद निर्माण करण्याऐवजी जनतेला पाहिजे ती वेगळी कामे करा,असा सल्ला त्यांनी दिला.तालुक्यात इतरत्र असेच होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधत परवाही त्यांनी (आढळराव) चाकणमध्ये एकाच कामाची दोन भूमिपूजन केली,असा टोला त्यांनी मारला. सोशल मीडियामुळे जनता हुशार झाली असून त्यांना कोणी काय कामे केली हे आठवत असल्याने त्याचे फुकाचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करु नये,असे आवाहन शेवटी मोहितेंनी केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT