Shivsena UBT News : 'पुण्याप्रमाणे ठाण्यातील मोकाट गुंडांची परेड घ्या' - ठाकरे गटाच्या मागणीतून मुख्यमंत्री शिंदे 'टार्गेट'

MP Rajan Vichare : खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहर पोलिस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची घेतली भेट
MP Rajan Vichare
MP Rajan VichareSarkarnama
Published on
Updated on

'ठाण्यातील वाढती गुन्हेगारी ताबडतोब रोखा. पुण्याप्रमाणे ठाण्यातही मोकाट असलेल्या गुंडांची परेड घ्या. उद्या काही झाले ते जबाबदारी आपली असेल.' असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहर पोलिस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन दिला आहे. तसेच पोलिस ठाण्यात झालेला गोळीबार आणि ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याशेजारी शाळकरी मुलावर हल्ला झाल्याच्या घटनेचीही आठवण यावेळी खासदार विचारे यांनी करून दिली आहे.

वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक पाऊले उचण्यासाठी सोमवारी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने खासदार विचारे यांच्यासह पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र ते नसल्याने सह पोलिस आयुक्त चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याकडे मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Rajan Vichare
Dombivali Politics : 'त्या' घटनेनंतर डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना नेते पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र!

यावेळी, दिलेल्या निवेदनात 'सध्या ठाणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. घटनाबाह्य सरकारकडून वाढत्या गुन्हेगारीला चालना मिळते की काय? असे आता वाटायला लागले आहे. जेव्हापासून हे सरकार सत्तेत आले आहे या ठाणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून सूडबुद्धीने कारवाई करणे, कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करणे, शाखा बळकावणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे हे प्रमाण वाढले आहे. खास करून मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे शहरात या गोष्टी राजरोसपणे चालू आहेत.' असेही म्हटले आहे.

याशिवाय 'सध्या महाराष्ट्रात गुंडांचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याची कबुली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एका वृतपत्राला दिली आहे. पोलीस प्रशासन ही एक घटनात्मक व्यवस्था आहे . त्यामुळे ती संमत कायद्यानुसार असायला हवी अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.' असेही म्हटले आहे. आणि 'जे गुंड खुलेआम मोकाट फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकून गुन्हेगारी प्रवृत्ती रोखावी.' अशी मागणी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

MP Rajan Vichare
Abhijit Bangar News: कळव्यातील स्वच्छता मोहिमेला मनपा आयुक्तांची दांडी अन् राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com