Shivajirao Aadhalrao Patil: 'खासदारकीसाठी मी ‘आक्रोश’ करणार नाही...' : आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं

Shivsena Shivsankalp Yatra : 'महायुतीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मला मान्य असेल...'
Shivajirao Aadhalrao Patil
Shivajirao Aadhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

गणेश कोरे -

Shirur News : मी खासदारकीसाठी आक्रोश करणार नसल्याचे सांगत आढळराव यांनी नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या आक्रोश यात्रेवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘ज्यांना निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी आक्रोश करायचाय त्यांनी करावा. पण मी पराभवानंतर विकासाचं मिशन घेऊन कार्यरत आहे. शिवसेनेला नवचैतन्य आणि नववैभव आणण्यासाठी माझं स्वतःचं मिशन आहे. पराभवानंतर कुठलेही पद, खासदारकी नसताना, वणवण फिरतोय. ते केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी लढत असल्याचेही आढळरावांनी मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केले.

तसेच शिरूर हा मतदारसंघ खूप चर्चेत आहे. सगळ्यांनी यावर दावा केला आहे. मात्र, महायुतीच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मला मान्य असेल. पण मी खासदारकीसाठी आक्रोश करणार नाही. आपला आदेश मोलाचा राहील. आमचे करिअर पणाला लावून आम्ही तुमच्यासोबत आलोय. आमच्यासाठी एकनाथ शिंदे यांचा निर्णय मान्य राहील, असेही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी सांगितले.

Shivajirao Aadhalrao Patil
Sharad Pawar - Ajit Pawar : पवारांसोबत एकाच मंचावर येणं अजितदादांनी टाळलं; पुण्यात असूनही संमेलनाला दांडी

शिवसेनेच्या (शिंदे गट) शिवसंकल्प अभियानाचा प्रारंभ शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड (ता. राजगुरुनगर) येथून शनिवारी (ता. ६) झाला. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil), शिवसेनेच्या नेत्या आमदार शीतल म्हात्रे, पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘विश्‍वासघात करून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून स्वतः मुख्यमंत्री झालेल्यांचं सरकार गेल्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारने दीड वर्षात अनेक शेतकरीहिताचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी ते निकष बदलत मोठी मदत शेतकऱ्यांना केली आहे.

हे सरकार शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिलांचे सरकार आहे. मी स्वतः शेतकरी असल्याने मला शेतकऱ्यांचे प्रश्‍न जास्त माहिती आहेत. मी घरात बसून, उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नसून, शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जाणारा शेतकरी कार्यकर्ता आहे. यामुळे आपण शेतकरीहिताच्या विविध योजना आणतोय. यासाठी द्राक्ष आणि डाळिंबासाठी विशेष योजना लवकरत आणतोय, असेही शिंदे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आपला संकल्प अबकी बार ४५ पार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता बनत आहे. ही महासत्ता अधिक बळकट करण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, यासाठी अब की बार ४०० पार असा नारा मोदींनी दिला आहे, तर आपला संकल्प महाराष्ट्रातून अब की बार ४५ पार हा असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर करून टाकले.

आढळरावांच्या उमेदवारीचे संकेत...

सलग तीन वेळा खासदार असताना आढळराव तुम्ही मागील निवडणुकीत पराभूत झाले. मात्र पराभूत होऊनसुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहात. तुम्ही अभिनेते नसून, खऱ्या अर्थाने लोकनेते आहात. तुमच्या कामाची पोहोचपावती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रशंसा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिरूर लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Shivajirao Aadhalrao Patil
Yavatmal : असंवेदनशीलतेचा कळसच! मृतक, जखमी, पोलिस वाऱ्यावर; भोंडेकर हार-तुऱ्यात मग्न

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com