Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी पूर्वग्रहदुषितपणे भिसे कुटुंबियांकडे 20 लाख रुपये मागितल्याचा दावा गोरखे यांनी केला आहे. डॉ. घैसास यांनी सांगितलेल्या ठिकाणी आयव्हीएफची ट्रीटमेंट केली नाही, म्हणून असे केल्याचा दावा गोरखेंनी केला आहे.
तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालयासह डॉ. घैसास यांची सध्या चौकशी सुरू आहे. आतापर्यंत दोन अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाले आहे. त्यातच गोरखे यांनी नव्या वादाला तोंड फोडत डॉ. घैसास यांना पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. घैसास यांना पाठिशी घालणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
मीडियाशी बोलताना आमदार गोरखे म्हणाले, डॉ. कदम हे घैसास यांचे समर्थन करत आहेत, याचे आश्चर्य वाटले. तर सरळसरळ खोटं बोलत आहेत. डॉक्टर असूनही त्यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांनी म्हटलंय की, डॉ. घैसास यांनी अपेक्षित खर्चाची माहिती दिली होती. पण डॉ. घैसास यांनी 10 लाख डिपॉझिटची पावती दिली होती. ती पावती बघावी. घैसासांची चूक नसून केळकरांची चूक असल्याचे कदम म्हणत आहेत. याचेही विश्लेषण होणे गरजेचे आहे.
घैसास यांच्या चुकीमुळे गर्भवती महिलेचे निधन झाले आहे. त्यांची बदनामी करण्याचे काम कदमांनी थांबवावे. तुम्ही डॉक्टर आहात, तुमचा या विषयातील अभ्यास असला पाहिजे. त्यांना कॅन्सर होता, केमोथेरपी झाली, रेडिओथेरपी झाली, असे आपण म्हणत आहात. अशा थेरपीमध्ये आठ महिन्यांचा गर्भ राहू शकतो का, असा सवाल गोरखे यांनी उपस्थित केला आहे. कोणतीही थेरपी झालेली नाही, हे अहवालात स्पष्ट होईल, असेही गोरखे म्हणाले.
डॉ. घैसास यांना 4 एप्रिल 2024 ला भिसे दाम्पत्य भेटले होते. त्यावेळी डॉ. मानसी घैसास यांच्याकडे तुम्ही आयव्हीएफची ट्रीटमेंट करा, असे भिसेंना सांगण्यात आल्याचा दावा आमदार गोरखेंनी केला आहे. त्यामुळे त्या मानसी घैसास यांच्याकडे गेल्या. पण तिथे त्यांना परिपूर्ण वाटले नाही, म्हणून त्या इंदिरा आयव्हीएफमध्ये गेल्या. त्यानंतर जवळजवळ एक ते दीड महिने घैसास ट्रीटमेंट करत होते. त्या गर्भवती असल्याचे त्यांना माहिती होते.
त्यानंतर 15 मार्च 2025 ला भिसेंनी घैसासांची भेट घेतली होती. भेटीवेळी त्यांना समजले की, भिसेंनी आयव्हीएफची ट्रीटमेंट मानसी घैसास यांच्याकडे घेतली नाही, इंदिरा आयव्हीएफमध्ये घेतली. म्हणून त्यांनी पूर्वगृहदुषितपणे त्यांनी 20 लाख मागितले आणि दहा लाख सांगितले आणि डिपॉझिटही लिहून दिले. सुशांत भिसे आणि डॉ. घैसास यांचे फोन रेकॉर्डिंग चेक केले तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही गोरखे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.