Eknath Shinde, Devendra Fadnavis, Amit Shah, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Amit Shah Pune Tour : रात्रीचा खेळ सुरू ? अमित शाह, शिंदे, फडणवीस, अजितदादा एकाच हॉटेलमध्ये !

Sunil Balasaheb Dhumal, उत्तम कुटे

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची चर्चा थांबते न थांबते तोच केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे शनिवारी रात्री पुण्यात पोचले. ते दौऱ्याअधीच पुण्यात ४० मिनिटे अधीच आल्याने गोंधळ उडाला पण शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही मंडळी एकाच हॉटेमध्ये दाखल झाली. त्यामुळे नव्या राजकीय घडामोडींना वेग येणार याचे संकेत मिळाले. ही मंडळी एकत्र आल्याने तेही एकाच हॉटेलमध्ये थांबल्याने नेमके काय घडणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, लोकसभेची निवडणूक रणनिती आखण्य़ासाठीच ते एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Latest Political News)

चिंचवड येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या 'डिजिटल पोर्टल'चे उदघाटन अमित शाह रविवारी दुपारी बारा वाजता करणार आहेत. देशात 1550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्याच्या उदघाटनानंतर सायंकाळी शहा हे दिल्लीला परतणार आहेत. दरम्यान, रविवारच्या एका कार्यक्रमासाठी शाह शनिवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

शहा हे पुण्यात आल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार हेही मुंबईहून पुण्यात दाखल झाले. ते पुण्यातील एका ताराकिंत हॉटेलात मुक्कामी आहेत. याच हॉटेलामध्ये शाहांचाही मुक्काम आहे. रात्री या चौघांत मॅरेथॉन बैठक होणार असल्याचे समजले. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविली जाण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही यावेळी चर्चा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, नियोजित वेळेनुसार रात्री आठ वाजता शहा यांचे विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर उतरणार होते. मात्र, ते तासभर अगोदरच आल्याने प्रशासन आणि कार्यकर्त्यांचीही थोडी तारांबळ उडाली. मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आदींनी त्यांचे स्वागत केले.

शहा पुण्यात असताना मोदीही पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी आणि मावळातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन विकास तथा आधुनिकीकरणाच्या भूमिपूजनाला 'ऑनलाइन' हजेरी लावणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT