Pune News, 15 Feb : विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे वळवला आहे. यासाठी स्थानिक नेत्यांना पक्ष संघटनेचं काम जोमाने करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
यासाठी पक्षाचे सदस्त वाढवण्यासाठी नवीन सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अशातच आता पुण्यात भाजपकडून पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा कार्यक्रम व्हावा, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. शहांच्या कार्यक्रमामुळे शहरातील कार्यकर्त्यांना बळ येऊ शकतं. तसंच आगामी निवडणुकांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.
पुण्यात (Pune) केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक 22 फेब्रुवारीला पार पडणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र, यावेळी त्यांचा राजकीय कार्यक्रम होणार की नाही हे निश्चित झालेलं नाही. मात्र, त्यांचा कार्यक्रम व्हावा यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
कोरेगाव पार्क येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या पश्चिम विभागीय बैठकीचे अध्यक्ष शहा असणार आहेत. यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसंच या दिवशी गणेश कला क्रीडा मंच येथे सहकार विभागाचा कार्यक्रम होणार आहे.
बालेवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे वाटप होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा हे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
त्यामुळे भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांचा पुण्यात कार्यक्रम व्हावा यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. मात्र, शहा राजकीय कार्यक्रम घेणार की नाही याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.