Suresh Bankar Letter To Uddhav Thackeray : उद्धव साहेब तुमचे आभार, जुलूमशाही विरोधात साथ दिली, स्वाभिमान जागवला, क्रांतीची मशाल पेटली!

Suresh Bankar expresses gratitude towards Uddhav Thackeray while leaving the party. : विधानसभेसाठी केलेले हे सीमोल्लंघन आता घरवापसीत परिवर्तीत झाले. सुरेश बनकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, पण तो करत असताना सुरेश बनकर उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला विसरले नाही.
Suresh Bankar-Uddhav Thackeray News
Suresh Bankar-Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेले भाजपचे सुरेश बनकर यांनी आज घरवापसी केली. पाच महिन्यात उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करताना सुरेश बनकर यांनी त्यांना एक खुले पत्र लिहित त्यांचे आभार देखील मानले आहेत. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील जुलूमशाही विरोधात मोलाची साथ दिली, मनामनात क्रांतीची मशाल पेटवलीत, स्वाभीमान जागवलात अशा शब्दात ठाकरेंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात महायुती असतांना अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काम केले. परिणामी त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे कल्याण काळे निवडून आले. याचा वचपा काढण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी त्यांचे कट्टर समर्थक सुरेश बनकर यांना शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षात प्रवेश देऊन विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली. मतदारसंघातील सगळ्या विरोधकांनी एकजूट दाखवत अब्दुल सत्तार यांना पराभवाच्या समीप आणले. पण नशिब बलवत्तर म्हणून सत्तार अवघ्या 2420 मतांनी तरले.

Suresh Bankar-Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Vs Congress : आघाडीत होणार बिघाडी! उद्धव ठाकरेंना काँग्रेस देणार मोठा झटका? 'या' पदावर केला दावा

विधानसभेसाठी केलेले हे सीमोल्लंघन आता घरवापसीत परिवर्तीत झाले. सुरेश बनकर यांनी आज (BJP) भाजपमध्ये प्रवेश केला, पण तो करत असताना सुरेश बनकर उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला विसरले नाही. एक खुले पत्र लिहून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. साहेब सप्रेम जय महाराष्ट्र, आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वगृही परतलो.

Suresh Bankar-Uddhav Thackeray News
BJP News : पक्ष बदलला तरी नशीब साथ देईना, सत्तारांना घाम फोडणारे सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला. त्यावेळी मी भाजपाचा 35 वर्षांपासून सक्रिय पदाधिकारी होतो.परंतु माझ्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेला होणारा त्रास, छळ लक्षात घेता मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मा.उद्धव साहेब आपण विश्वास ठेऊन उमेदवारी दिली. आपण सर्वांनी मिळून एकजुटीने आणि एकदिलाने जुलुमशाहीच्या विरोधात झुंज दिली.

Suresh Bankar-Uddhav Thackeray News
Raosaheb Danve News : थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय; रावसाहेब दानवे म्हणतात, पक्षाने संधी दिली तर 2029 मध्ये लोकसभा लढवणार!

दुर्दैवाने काही मतांनी आपला पराभव झाला.आमच्या या जुलुमशाहीच्या विरोधातील लढ्यामध्ये मा.उद्धव साहेब आपण मोलाची साथ आम्हाला दिली. घराघरात क्रांतीची मशाल ज्योत पेटली, स्वाभिमान जागवला.याबद्दल उद्धवसाहेब आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या भविष्याच्या विचार करून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. माननीय उद्धवसाहेब तसेच शिवसेना उबाठा पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व मायबाप जनता आमच्या मतदारसंघाची अडचण आणि एकूण परिस्थिती लक्षात घेतील ही आम्हाला अपेक्षा आहे, अशा शब्दात सुरेश बनकर यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाचे आभार मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com