Pune News :लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक पुरस्कार'प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना अमित शाह यांनी अजित डोवाल यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा आठवणीतील एक महत्त्वाचा किस्सा उपस्थितांसमोर सांगितला.
अमित शाह म्हणाले, "मी जेव्हा गुजरातचा गृहमंत्री होतो, तेव्हा माझी आणि अजित डोवाल यांची पहिली ओळख झाली. त्यापूर्वी आमचा कोणताही परिचय नव्हता. गुजरातमध्ये सिरीयल बॉम्बस्फोट झाले होते.
त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मला बोलावून सांगितले की, गुजरातसह इतर ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटांची सखोल चौकशी गुजरात पोलिसांनी केली पाहिजे. दोषींचा शोध घेण्यासाठी तुम्ही अजित डोवाल यांना बोलावून आपल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करा."
शाह पुढे म्हणाले, "मला आठवतंय, दुपारच्या वेळी अजित डोवाल माझ्या घरी आले होते. त्यांनी त्यावेळी जी महत्त्वपूर्ण टीप दिली, त्यामुळे केवळ अहमदाबाद बॉम्बस्फोटच नाही, तर देशभरातील तब्बल १३ बॉम्बस्फोटांचे गुन्हे गुजरात पोलिसांनी उघडकीस आणले होते.
२०१४ च्या घटनेचा उल्लेख करताना शाह म्हणाले, २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी सर्वात पहिली नियुक्ती ही मुख्य सचिवांची न करता, अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली होती त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात अजित डोवाल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख नक्कीच असेल. अस अमित शाह म्हणाले.
शाह यांनी डोवाल यांच्या दीर्घ कारकिर्दीचे कौतुक करताना सांगितले की, १९७२ पासून देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचे निराकरण करण्यात अजित डोवाल यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या कार्याचे मूल्यांकन किंवा चित्रांकन करणे अत्यंत कठीण असून शब्दांत सांगणे अशक्य आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.