ITR Filing : ITR फाइलिंगची मुदत वाढली की नाही? करदात्यांसाठी महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट आले समोर!

ITR filing due date latest news : ITR फाइलिंगची मुदत वाढली आहे का? आयकर रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेबाबतचे ताजे अपडेट, अधिकृत माहिती आणि करदात्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या.
ITR Filing : ITR फाइलिंगची मुदत वाढली की नाही? करदात्यांसाठी महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट आले समोर!
Published on
Updated on

आयकर रिटर्न (ITR) भरण्याबाबत करदात्यांमध्ये मोठी उत्सुकता असताना महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचारी तसेच ITR-1 आणि ITR-2 श्रेणीतील वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जूलै 2026 होती. मात्र, आतापर्यंत आयकर विभागाकडून ही अंतिम तारीख वाढवण्यात आल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे मानले जात आहे.

ज्या करदात्यांनी 31 जूलै 2026 किंवा त्यापूर्वी आयकर रिटर्न भरला आहे, त्यांच्यासाठी ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अजूनही पूर्ण करता येणार आहे. नियमांनुसार, रिटर्न दाखल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असते. त्यामुळे संबंधित करदाते ही प्रक्रिया दिलेल्या कालावधीत सहज पूर्ण करू शकतात.

ITR Filing : ITR फाइलिंगची मुदत वाढली की नाही? करदात्यांसाठी महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट आले समोर!
Modi Gen Z Video : 'फेसबुक मुख्यमंत्री' म्हणणारे आज इन्स्टाग्रामवर सक्रिय; मोदींच्या सलग 3 व्हिडिओंवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

दरम्यान, जे करदाते 31 जूलै पर्यंत ITR दाखल करू शकले नाहीत, त्यांनाही रिटर्न भरण्याची संधी उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे. काही प्रकरणांमध्ये हे दंडात्मक शुल्क 5000 रुपयेपर्यंत असू शकते. हा दंड करदात्याच्या उत्पन्नाच्या श्रेणी आणि लागू असलेल्या नियमांनुसार निश्चित केला जातो.

गेल्या काही वर्षांतील आयकर विभागाच्या निर्णयांचा आढावा घेतल्यास वेगवेगळे चित्र दिसून येते. 2021-22 मध्ये कोविड-19 महामारीमुळे मोठा दिलासा देण्यात आला होता. सुरुवातीला 31 July ची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आणि नंतर ती 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही मुदतवाढ मिळेल का, याकडे करदात्यांचे लक्ष लागले असले तरी सध्या तरी आयकर विभागाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com