Amit Thackeray Latest News
Amit Thackeray Latest News Sarkarnama
पुणे

पिंपरी दौऱ्यात अमित ठाकरेंचं स्वागत केलं भाजप नेत्यांनी

उत्तम कुटे

पिंपरी : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांचे चिरंजीव अमित (Amit Thackeray) हे सध्या राज्य दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या या पुनर्बांधणी महासंपर्क अभियानात त्यांनी रविवारी (ता.१४ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवडला भेट दिली. भाजपचे (BJP) स्थानिक नेते त्यांच्या या दौऱ्यात सहभागीच झाले नाहीत,तर त्यांनी त्यांचे स्वागतही केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यातून आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपचे काय समीकरण असेल, याची चर्चा रंगली. (Amit Thackeray Latest News)

दरम्यान, पिंपरी दौऱ्यातही अमित यांचे फूटबॉल खेळावरील प्रेम दिसले. ताथवडे येथील फुटबॉल टर्फ ग्राऊंडवर घुंगराचा आवाज घेऊन फुटबॉल खेळणाऱ्या विशेष (अंध) महिला खेळाडूंसोबत ते फुटबॉल खेळले. त्यांना प्रोत्साहन दिले.एवढेच नाही,तर या खेळासाठी लागणारा खर्च देण्याचा शब्दही दिला. दरम्यान, त्यांच्या या भेटीचा फायदा आगामी पालिका निवडणूकीमध्ये शहरात मनसेला फायदा होणार का,अशी चर्चा यानिमित्त ऐकायला लगेच सुरु झाली आहे.

संघटनेला बळ देण्यासाठी अमित यांचा हा महासंपर्क राज्य दौरा सुरु आहे. त्यात ते महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत आहेत. तसेच पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही चर्चा करीत आहेत. १२ ते १४ ऑगस्टच्या पुणे जिल्हा दौऱ्यासाठी ते काल आले. पुण्यातील ८ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील ५ विधानसभा मतदारसंघात जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत. कालच्या पुणे शहर दौऱ्यानंतर आज दुपारी पिंपरीत ते आले. येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

डांगे चौक, थेरगाव येथील अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार प्रथम अर्पण केला.त्यानंतर चिंचवड येथे हेमंत डांगे यांच्या निवासस्थानी ७०० किलोचा हार त्यांना घालण्यात आला. यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष विजय फुगे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे ,राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते राजु मिसाळ यांनीही अमित यांचे स्वागत केले.नंतर निगडी प्राधिकरणातील केरला भवन येथे शहर मनसेच्या वतीने त्यांचे स्वाग करण्यात आले.तेथे त्यांनी कॉलेज विद्यार्थ्यांबरोबर संवाद केला.त्यांचे प्रश्न व सुचनाही ऐकल्या. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मध्ये नोंद झालेल्या सात वर्षांच्या देशना नहार या मुलीचा सत्कार त्यांनी यावेळी केला. येथेच त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकांऱ्याबरोबर चर्चा केली. शहरातील अडीअडणी त्यांच्याकडून समज़ुन घेतल्या. पुन्हा लवकरच शहरात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. येथील भेट आटोपून सायंकाळी ते खेडच्या दिशेने रवाना झाले.

दरम्यान,अमित हे शहरात प्रथमच आणि माझ्या प्रभागात आल्याने त्यांचे स्वागत केले,असे मिसाळ यांनी सांगितले.तर, भाजपच्या वतीने अमित यांचे स्वागत करून त्यांच्या यात्रेला यावेळी शुभेच्छा दिल्या,असे अॅड. शेडगे म्हणाले. यावेळी त्यांना हर घर तिरंगा उपक्रमात तिरंगा भेट दिला. ही भेट त्यांना आवडली,असे शेडगे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT