आमदार असताना सतराशे कोटी अन् मंत्री झाल्यावर फक्त चारशे; शंभुराजेंनी व्यक्त केली खदखद

Shambhuraj Desai : अजितदादा मित्र आहेत पण निधी वाटपात मैत्री नसायची
shambhuraj desai-uddhav thackery Latest News
shambhuraj desai-uddhav thackery Latest News Sarkarnama

कराड : जेव्हा 2014 ते 2019 या काळात युतीचा आमदार असताना मतदार संघात सतराशे कोटी रुपयांचा निधी मिळाला महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अडीच वर्षात मंत्री झालो पण निधी केवळ चारशे कोटी रुपयांचा मिळाला, अशी खदखद राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केली.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज शंभुराज देसाई पहिल्यांदा पाटण विधानसभा मतदारसंघात आले यावेळी एकनाथ शिंदे गटात का गेलो याचा लोकांसमोर खुलासा ते करत होते. (shambhuraj desai-uddhav thackery Latest News)

shambhuraj desai-uddhav thackery Latest News
चव्हाणांसाठी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार झालेले गोरे आज समोरासमोर येऊन बोललेही नाही

महाविआकास आघाडीत होणारी घुसमट शंभुराज देसाई यांनी मांडली, 'अर्थराज्य मंत्री असूनही बजेटमध्ये आमच्या मतदारसंघाला काहीच नसायचं, अजितदादा मित्र आहेत पण ते निधी वाटपात मैत्री नसायची. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेलो की ते म्हणायचे बघू आणि नंतर भेटायचंच नाहीत',अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

shambhuraj desai-uddhav thackery Latest News
मेंटेंबद्दल बोलताना सदाभाऊंना अश्रू अनावर

विधानपरिषद निवडणुकीत कशाप्रकारे एकनाथ शिंदे यांना डावललं, आमदारांवर गैरविश्वास दाखवला याचेही किस्से यावेळी सांगितले. शंभुराज देसाई यांचे कराड आणि पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केलं.अनेक ठिकाणी जेसीबीने फुल उधळली. मरळी येथे विराट सभा झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com