Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe : आता घरवापसीची गरजच काय? अमोल कोल्हेंची अतुल बेनकेंना वॉर्निंग!

Sunil Balasaheb Dhumal

Shirur Political News : शिरूर लोकसभा मतदारसंघात विरोधी गटाचे वर्चस्व असतानाही अमोल कोल्हेंना मिळेलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी तीन पट जास्त मते घेत कोल्हे खासदार झाले आहेत. त्यामुळे आता कुणाच्याही घरवापसीची गरज नाही, असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी नाव न घेता जुन्नरचे आमदार अतुल बेनके लगावला आहे.

विजयानंतर कोल्हेंनी गुरूवारी सायंकाळी पिपंळगाव जोगा डिंगोरे जिल्ह परिषद गटातील मतदारांचे आभार मानले. यावेळी डिंगोरे येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यलयाचे उद्घाटन झाले.

ते म्हणाले, विकासासाठी सत्तेत गेलो असे अजितदादा Ajit Pawar वारंवार सांगतात. मात्र त्यांना बरोबर घेऊन चूक झाली असे आरएसएसच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली. त्यामुळे आता विकासाचे नाव घेऊन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यांना आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला 158 विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी आहे. त्यामुळे अजित पवार गटात गेलेले लोकांची घरवापसी होणार का, असे प्रश्न पत्रकार उपस्थित करत आहेत.

या प्रश्नाचे उत्तर मला महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्त्याला विचारावे लागेल. कळले का घरवापसी कोणाबद्दल? जुन्नर तालुक्यात निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्त्याने निर्णय घेऊन जर 51 हजाराची लिड दिली. त्यामुळे आता घरवापसीची गरज काय ?, असा थेट प्रश्न करत खासदार कोल्हेंनी आमदार अतुल बेनके Atul Benke यांच्यासाठी घरवापसीचे दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट करून चर्चेला पूर्णविराम दिला.

गेल्या 2019 च्या निवडणुकीत लिड होते. पण प्रत्येकवेळी आम्ही निवडून आणले, आम्ही लिड दिले, हे कायम कानावर पडत होते. मात्र या निवडणुकीत आम्ही निवडून आले म्हणत होते, त्यांनी तेव्हा फक्त 58 हजार मतानी निवडून आणले होते. यावेळी मात्र जनतेने एक लाख 41 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलो. ही जनतेची ताकत आहे, असे अप्रत्यक्ष टीका कोल्हे Amol Kolhe यांनी विरोधातील सर्व आमदारांवर केली.

शिरूर लोकसभा निवडणूक सोपी नव्हती. सहापैकी पाच आमदार विरोधात होते. पालकमंत्र्यांचा प्रभाव या मतदारसंघात होता. राज्यात व केंद्रातील सत्ता ही त्यांच्या हातात होती. पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली. शरद पवारांचा करिष्मा, उध्दव ठाकरेंचा प्रभाव, राहुल गांधी यांच्यावरील विश्वास आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमुळे हा विजय सोपा झाला.

असे असणार कामाचे नियोजन

निवडणुकीत खासदार उपलब्ध होत नाहीत, असा प्रचार करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कोल्हेंनी त्यांच्या कामाचे नियोजनही स्पष्ट केले. यापुढे सोमवार ते गुरूवार खासदार मतदारसंघात असणार आहे. सोमवारी पुणे कार्यालयात, गुरूवारी नारायणगाव कार्यलयात उपलब्ध असणार आहे. आदर्श ग्रामसाठी कोणताही विशेष निधी मिळत नसतानाही आपण तेथील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. लवकरच सर्व आदिवासी भागातील गावांना भेट देऊन आभार दौरा ओयोजित करणार आहे. खासदार आपल्या दारी ही योजना प्रत्येक जिल्हा परिषद गटात राबवणार आहे, असेही कोल्हेंनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT