BS Yediyurappa : ते टॉम, डिक किंवा हॅरी नाहीत! येडियुरप्पांच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Karnataka High Court BJP Leader Sexual harassment case : लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टाने येडियुरप्पा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.  
BS Yediyurappa
BS YediyurappaSarkarnama

Karnataka : कर्नाटक हायकोर्टाने शुक्रवारी माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना मोठा दिलासा दिला. लैंगिक शोषण प्रकरणात त्यांना 17 जूनपर्यंत अटक करू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. ते टॉम, डिक किंवा हॅरी नाहीत, पळून जाणार नाहीत, असे कोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले.

न्यायाधीश एस. कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यांच्यावर मार्च महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सीआयडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावली आहे.

BS Yediyurappa
Video Tejashwi Yadav : पिय्यकड पुत्र! तेजस्वी यादव यांचा मद्यधुंद स्थितीतील व्हिडिओ? नेमकं काय घडलं...

राज्याच्या गृहमंत्र्यांनी येडियुरप्पांना सीआयडीकडून अटक केली जाऊ शकते, अशी सूचक विधान केले होते. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते, या चर्चांना उधाण आले होते. तसेच कोर्टानेही गुरूवारीच त्यांच्याविरोधात पोक्सो प्रकरणात अटक वॉरंट जारी केले होते.

त्यावर सुनावणीवेळी कोर्ट म्हणाले की, येडियुरप्पा हे टॉम, डिक किंवा हॅरी नाही. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते देश सोडून पळून जातील असे तुम्हाला वाटते का? बेंगळुरूतून दिल्ली जाऊन ते काय करतील, असे उलट प्रश्न कोर्टाने सरकारला विचारले.

BS Yediyurappa
Yogi Adityanath : CM योगी मोहन भागवतांना भेटणार; निवडणूक निकालानंतर पहिल्याच भेटीने चर्चांना उधाण...

येडियुरप्पा यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका कोर्टात दाखल केली आहे. सीआयडीच्या नोटिशीवर त्यांनी 17 जूनला चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले आहे. याबाबत त्यांच्या वतीने कोर्टाला माहिती देण्यात आली.

येडियुरप्पा चौकशीला हजर राहणार असल्याने कोर्टाने त्यांना 17 जूनपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले. तसेच कोर्टात या प्रकरणावर पुढील सुनावणीही याच दिवशी आहे. त्यामुळे कोर्टात या दिवशी काय सुनावणी होणार आणि सीआयडी चौकशीत काय घडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com