Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असताना महायुतीचे नेते गप्प का? अमोल कोल्हेंचा सवाल

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच ऍक्टिव्ह मोडवर असतो. लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवून दिला. त्यामुळे ही यात्रा संपूर्ण मतदारसंघातून फिरणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्रातील महायुतीचे नेते दिल्लीपतींच्या डोळ्यात डोळे घालून का बोलत नाहीत. महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जात असताना विरोध का करत नाहीत. महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीपतींना दिलेलं हे गिफ्ट आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

या आधीही अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतात, गुजरात म्हणजे पाकिस्तान आहे का? असा सवाल केला जातो. स्पोर्ट सीटी गुजरातला नेली. त्यांना मोठा निधी दिला. पण ॲालंपिकमध्ये पदके आणली ती हरियाणाने. हरियाणाला फक्त दहा टक्के निधी खेळांसाठी दिला जात असल्याचा आरोप यावेळी अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केला. (Amol Kolhe News)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच ऍक्टिव्ह मोडवर असतो. लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवून दिला. त्यामुळे ही यात्रा संपूर्ण मतदारसंघातून फिरणार आहे. शरद पवार साहेब संवादाची दारे कायमची उघडी ठेवतात. या नेत्यांना जर पवार साहेबांसोबत यायचे असेल तर ही गोष्ट अधोरेखित करणारी आहे की, लोकसभेत शरद पवारांचे नाव महाराष्ट्राच्या काळजात कोरलेले आहे, असे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला का ? असा सवाल त्यांना काही पत्रकारांनी विचारला. त्यामुळे महायुतीकडून असाच प्रकार सुरू आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून असा प्रकार आहे. लाडकी बहीण योजना घेऊन महायुतीचे सरकार पुढे चालले आहे. पण महायुतीमध्येच एक वाक्यता या योजनेवरून दिसत नाही. तिन्ही पक्ष लाडकी बहीण योजनेचे वेगवेगळी नावे सांगतात त्यांच्यातच गोंधळ दिसून येत आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

परमबीर सिंग यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सातत्याने आरोप केले जात असल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, राज्यातील जनता जाणती आहे. अचानक या सर्व गोष्टी बाहेर येतात. मग ही स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे, हे जनतेला माहिती आहे. मी राज ठाकरे यांची कुठलीही प्रतिक्रिया ऐकली नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT