Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याबाबतचा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थिती केला आहे. सुषमा अंधारे ह्या अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेटल्या होत्या, याबाबतची खात्रीदायक माहिती फेब्रुवारी महिन्यातच आपल्याकडे आली असल्याचं दमानियांनी सांगितलं आहे. तसंच हे खरं की खोटं हे अंधारेंनी सांगावं असं आव्हान देखील अंजली दमानिया (Anjali Damania) त्यांनी दिलं आहे.
सध्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि अंजली या दमानिया यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम सुषमा अंधारे यांनी एक्सवर अंजली दमानिया यांचं नाव असलेल्या ब्रॉडकास्ट ग्रुपचा स्क्रीन शॉट शेअर केला होता. या ग्रुपच्या मेसेजमध्ये सुषमा अंधारे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
हा स्क्रिनशॉट समाज माध्यमातूनवर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्यावर टीका केली अंधारे म्हणाल्या, अहो दमानिया, जरा दमानं घ्या की, किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस. कधीतरी पूर्ण महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला, असा टोला दमानिया यांना लगावला.
तुम्ही या ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल करत तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. याला अंजली दमानिया यांनी उत्तर दिलं आहे. दमानिया म्हणल्या, केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे. खरंतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले.
मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती, की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात, आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे की नाही ह्यावर खरं उत्तर द्याल का? बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही.
तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. तुमच्या माहितीसाठी, काल एका चैनल ने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार, ह्यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक media broadcast च्या व्हॉट्सअप ग्रुप वर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला. असा खुलासा दमानियांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.