Ajit Pawar : कर्जमाफीचं आश्वासन अजितदादा विसरले... राजू शेट्टी अन् सतेज पाटील म्हणतात 'लाव रे तो व्हिडीओ'

Satej Patil and Ex MP raju shetti On Loan Waiver Controversy : राज्यातील महायुती सरकाराने शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. पण आता या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचेच समोर येत आहे.
Ajit Pawar Satej Patil and Ex MP raju shetti On Loan Waiver
Ajit Pawar Satej Patil and Ex MP raju shetti On Loan Waiver sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीवेळी महायुतीने दिले होते. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आपल्याच सरकारच्या जाहीरनामा नाकारला आहे. त्यांनी, शेतकरी कर्जमाफीवर यू-टर्न घेतला असून 'मी आश्वासन दिलं होतं का?' असा उलटा सवाल केल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो.

या वक्तव्यावरूनच विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. या दोघांनीही अजितदादांचे हे वक्तव्य राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेसह शेतकऱ्यांनी कांदा आणि इतर प्रश्नावरून महायुतीला नाकारले होते. यामुळे विधासभेच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली गेली. तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं. फक्त आश्वासनच दिलं नाही, तर याचा उल्लेख महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आला. पण आता या आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचे दिसून येत आहे.

नुकताच अजित पवार यांनी, याबाबत कोल्हापूर येथे वक्तव्य कराताना, 'मी आश्वासन दिलं होतं का?' असा उलटा सवाल केला. पण त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य करताना, आम्ही कर्जमाफीवरून शब्द फिरवला नसल्याचे म्हणाले होते. यामुळे महायुतीतील नेते असो किंवा राष्ट्रवादीतील नेते यांच्यात शेतकरी कर्जमाफीवर दुमत असल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar Satej Patil and Ex MP raju shetti On Loan Waiver
Ajit Pawar : "मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजितदादांच्या मनातलं पुन्हा एकदा आलं ओठांवर

काय म्हणाले अजित पवार?

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला घेरलं असून सतत टीका केली जातेय. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांचा अडकूर (ता. चंदगड) येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी ते पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी, कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिले होते का? असा सवाल केला. तर आपण असे कोणतेच आश्वासन दिलं नसल्याचेही स्पष्टीकरण दिले. यामुळे अजित पवारच काय तर महायुती आता या प्रश्नावर आपले हात वर करताना दिसत असून सरकार कर्जमाफीच्या मुद्याला बगल देत असल्याचे उघड झाले आहे.

ही तर शेतकऱ्यांची फसवणूक

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता विरोधकांवडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी देखील टीका करताना, महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. निवडणुकीच्या कालावधीत राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कर्जमाफी करू, असे म्हटले होते. याबाबतचे आजही त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र असे असतानाही महायुतीचे सरकार आपल्या आस्वासनापासून यू-टर्न घेत असल्याची टीकाही सतेज पाटील यांनी केली आहे.

Ajit Pawar Satej Patil and Ex MP raju shetti On Loan Waiver
Ajit Pawar Politics : शरद पवारांना धक्क्यावर धक्के ; दोन माजी मंत्री, तीन आमदारांपाठोपाठ अजित पवारांनी जिल्हाध्यक्षही लावला गळाला

अजित पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी

दरम्यान अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्याला दिलेल्या बगलीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, अजित पवार यांचे सध्याचे वक्तव्य म्हणजे महायुती शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचेच सिद्ध होत असल्याचे म्हटलं आहे.

विधानसभे वेळी महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं. पण आता नकार दिला जातोय. यामुळे महायुतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली का? याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी द्यावे असेही आवाहन केलं आहे. तर अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी असल्याची टीका ही शेट्टी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com