Ajit Pawar Politics : शरद पवारांना धक्क्यावर धक्के ; दोन माजी मंत्री, तीन आमदारांपाठोपाठ अजित पवारांनी जिल्हाध्यक्षही लावला गळाला

NCP leader Umesh Patil joins Ajit Pawar faction, setback for Sharad Pawar : दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही शुक्रवारी राजीनामा दिला.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra politics : दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही शुक्रवारी राजीनामा दिला. अतिशय तडकाफडकी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पाटील यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली नाही. मात्र आज दुपारी दोनला त्यांचा अजित पवार पक्षात प्रवेश निश्चित आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील असेच चोपड्याचे माजी आमदार कैलास बापू पाटील, पाचोर्‍याचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ आणि शिक्षक आमदार दिलीप सोनवणे या तीन माजी आमदारांसह मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आज दाखल होत आहे. जिल्हाध्यक्ष पाटील हेदेखील याचवेळी प्रवेश करतील.

Sharad Pawar, Ajit Pawar
Shivsena UBT : अनिल गोटेंच्या उमेदवारीमुळे ठाकरे गटात खदखद कायम; माजी आमदार आज घड्याळ हातात बांधणार

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. जळगाव जिल्ह्यात सर्व दहा जागांवर महायुतीचे आमदार आहेत. अमळनेर येथील अनिल पाटील हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आणि विद्यमान मंत्री आहेत.

सत्तेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाला जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक स्तरावर फारसा प्रतिसाद नव्हता. शरदचंद्र पवार पक्षाला मात्र विविध सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव कायम ठेवण्यात यश आले होते.

Sharad Pawar, Ajit Pawar
Ajit Pawar Politics: संकट जिल्हा बँकेचे; वसुली आणि व्याजमाफीचा वाद; प्रशासकांचा तडकाफडकी राजीनामा!

आता दोन माजी मंत्र्यांसह प्रमुख माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांनीच पक्षाला राम राम ढोकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावे लागणार आहेत. या सर्व नेत्यांचा आज दुपारी दोनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबईत प्रवेश होईल.

जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी गेले काही दिवस हालचाली सुरू होत्या. जामनेर येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार लढत देणारे दिलीप खोडके यांचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून नाव चर्चेत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवे कार्यकर्ते आणि चेहरे मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.