"Rohit Pawar reacts sharply to Ajit Pawar’s Hindi after his video with Anjana Krishna goes viral." Sarkarnama
पुणे

IPS Anjana krishna News : अंजना कृष्णा अन् अजितदादांमधील संवादातील 'कच्चा' मुद्दा रोहित पवारांनी हेरला; तिथंच गडबड झाल्याचं स्पष्टच सांगितलं...

Anjana Krishna and Ajit Pawar Video Goes Viral : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी त्याठिकाणी जाऊन योग्य तीच भूमिका बजावली. त्या महिला अधिकारी चुकल्या, असं मी कुठेच म्हणणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : मुरूम उत्खननावरून सोलापूरमध्ये आयपीएस अधिकारी डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून वाद झाले. त्यानंतर या संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. नेमका हा वाद कशामुळे झाला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उपमुख्यमंत्री महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत असल्याचं सांगत विरोधी पक्षातील काही नेत्यांनी थेट अजित पवारांवर कारवाईची मागणी केली. हा वाद वाढत असताना अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र त्यानंतर देखील हा वाद अद्यापही चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रोहित पवार म्हणाले, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी त्याठिकाणी जाऊन योग्य तीच भूमिका बजावली. त्या महिला अधिकारी चुकल्या, असं मी कुठेच म्हणणार नाही. त्याठिकाणी काहीतरी गफलत झाली. अजितदादा यांची हिंदी कच्ची आहे आणि त्या महिला अधिकाऱ्यांशी दादा हिंदीमध्ये बोलले. त्या हिंदीमध्येच गडबड झाली आणि त्या गडबडीमुळे अजितदादा अडचणीत आले, असं आमचं मत असल्याचं रोहित पवार म्हणाले.

या प्रकरणांमध्ये अधिकारीही चुकले नाहीत आणि दादांची ती बोलण्याची स्टाईल आहे, त्यामुळे तेही चुकले नाहीत. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला मराठी समजत नव्हती त्यामुळे दादा हिंदी मध्ये बोलायला गेले आणि गडबड तिथेच आहे. आणि त्यामुळे दादांना अडचणी निर्माण झाल्या, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.

महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत आमदार अमोल मिटकरी यांनी जी भूमिका घेतली ती चुकीची होती. त्यांनी ती भूमिका अजितदादांना खूश करण्यासाठी घेतली असावी. मात्र त्यानंतर अजित पवारांना अप्रत्यक्षपणे या सगळ्या घटनेवर माफी मागावी लागली आणि नंतर त्यांनी सांगितल्यानुसार अमोल मिटकरी यांनी देखील या प्रकरणात माघार घ्यावी लागली. सध्या अजित पवारांच्या पक्षांमध्ये गोंधळच गोंधळ आहे. कोण काय भूमिका घेत आहे यामध्ये कोणालाच काही ताळमेळ नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

गेला काही काळापासून भाजप आपल्या मित्र पक्षांचे महत्त्व कमी करण्याचे काम करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला फक्त ठाण्यापुरतं मर्यादित करून ठेवले आहे. तसंच अजित पवारांना देखील या प्रकरणावरून भाजपकडून टार्गेट करण्यात येत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT