Anna Hazare .jpg Sarkarnama
पुणे

Anna Hazare News: 'अण्णा... आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा...'; 'मतचोरी'चा मुद्दा तापला असतानाच पुण्यात झळकले हजारेंना डिवचणारे पोस्टर

Anna Hazare posters controversy : भाजप सरकारच्या काळामध्ये अण्णा हजारे यांचं कोणतेही मोठं आंदोलन पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सध्या काँग्रेस कडून देशभरामध्ये मत चोरी बाबत आंदोलन उभारण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर हे बॅनर सध्या पुण्यात झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्याच्या पाषाण परिसरामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो असलेले बॅनर झळकत असलेल्या पाहायला मिळत आहे. या बॅनर च्या माध्यमातून अण्णा हजारे यांना पुणेरी टोमणे मारले असल्याचं पाहायला मिळत आहेत. आता तरी उठा मत चोरी झालेली आहे, असं या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी 2012 मध्ये दिल्ली येथे मोठं आंदोलन उभारलं होतं. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर झालेल्या या आंदोलनात देशभरातून लोक सहभागी झाले होते. आणि याच आंदोलनाचा फटका 2014 मध्ये काँग्रेसला बसल्याचे देखील बोललं जातं. काँग्रेसची सत्ता जाण्यामध्ये कुठेतरी या आंदोलनाचा देखील वाटा होता असं अनेक जाणकार सांगतात.

मात्र, त्यानंतर भाजप (BJP) सरकारच्या काळामध्ये अण्णा हजारे यांचं कोणतेही मोठं आंदोलन पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सध्या काँग्रेसकडून देशभरामध्ये मत चोरी बाबत आंदोलन उभारण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर हे बॅनर सध्या पुण्यात झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बॅनरवर अण्णा हजारे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. त्यासोबतच कुंभकर्णाचा देखील फोटो या पोस्टरवर पाहायला मिळत आहे . तसंच अण्णा आता तरी उठा, कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा आवाहन या बॅनरच्या माध्यमातून अण्णा हजारे यांना करण्यात आला आहे.

देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकूमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना. अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा देखील सवाल या पोस्टर मागच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.

अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमचा जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे.होय मतांची चोरी झाली आहे India Against Votechori बाबतचा आंदोलन आम्ही बघण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणत एक प्रकारे पुणेरी टोला या पोस्टरच्या माध्यमातून अण्णा हजारेंना लगावला असल्याचं बोललं जात आहे.

समीर बबन उत्तरकर यांनी हा पोस्टर लावला असून आपण 2011-12 ला दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात झालेले आंदोलन दिवसभर टीव्ही वर पाहिलेला एक भारतीय नागरिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT