रत्नागिरीत महायुतीत खळबळ! नितेश राणे स्वबळाचा नारा, सामंतांनीही आपला निर्धार स्पष्ट केला

Ratnagiri political drama : तळ कोकणात सध्या भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत वादाचा स्फोट होताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना नेते आमने-सामने आल्याने महायुतीतच आगामी स्थानिकच्या आधी कलगीतुरा रंगल्याचे बोलले जात आहे.
Kokan Politics
Kokan Politicssarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • नितेश राणे यांनी रत्नागिरीत स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीत खळबळ उडाली.

  • उदय सामंत यांनी शिवसेनेचा सन्मान नसेल तर स्वतंत्र लढू, पण आता महायुतीतच लढू असे स्पष्ट केले.

  • दोन्ही पालकमंत्र्यांच्या विधानांमुळे जिल्ह्यात राजकीय कलगीतुराला सुरुवात झाली आहे.

Ratnagiri News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. महायुतीसह महाविकास आघाडीकडून मोर्चे बांधणी केली जात असतानाच तळ कोकणात महायुतीत कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तळ कोकणातील सिंधुदुर्ग असो की रत्नागिरी येथे भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे. यामुळे आगामी स्थानिकच्या तोंडावर महायुतीवरच प्रश्न चिन्ह उभ राहताना दिसत आहे. रत्नागिरीतही सध्या असाच वाद उफाळून आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच 4 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी आत्ताच दावेदार तयार केले जात आहेत. तशी घोषणा देखील दोन्ही पक्षांकडून केली जातेय.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दंड महायुतीने थोपाटले आहेत. पण जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी ठिणगी पडताना दिसत आहे. त्यात रत्नागिरी भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. येथे स्वतंत्र निवडणुका लढवण्याची स्थानिक नेत्यांसह दोन्ही पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रत्नागिरीचे संपर्कमंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत जाऊन स्वबळाचा नारा दिला आहे. तर यांच्या या घोषणेच्या आधी शिवसेनेचा योग्य सन्मान ठेवला नाही तर आमचीही स्वतंत्र लढण्याची ताकद असल्याचा इशारा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होता. यामुळे महायुतीमध्ये कलगीतुरा रंगल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

Kokan Politics
Kokan Politics : 'हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी' : आरोपांनी घेरलेल्या योगेश कदमांच्या डोक्यावर 'गॉडफादरचा' हात

कोकणातील भाजप व एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेत रत्नागिरीत सतत वादाची ठिणगी पडत आहे. त्यात तेल ओतण्याचे काम सिंधुदुर्गमध्ये जाऊन मंत्री भरत गोगावले यांनी केले होते. त्यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर केलेले आरोप केले होते. ज्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी पटवार करताना, तळ कोकणात भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची जणू घोषणाच केली आहे. यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांत आता वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

दरम्यान हा वाद काही कमी होत असतानाच उदय सामंत यांच्यावर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. ज्यावर काहीच न बोलता फक्त आमच्या शुभेच्छा म्हणत उदय सामंत यांनीही पलटवार केला. नितेश राणे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देताना, सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

त्यांनी, रत्नागिरीचे पालकमंत्री जिल्हा नियोजनाच्या निधीत गडबड करत आहेत. ते आपल्यासह किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांना प्रत्येकी 20 कोटी रुपये देत आहेत. मात्र खासदार असणाऱ्या नारायण राणे यांना 5 कोटी रुपये दिले आहेत. हा अन्याय नाही का? हा कधी थांबणार? असा सवाल केला आहे. तर भाजपशिवाय तळ कोकणात मित्रपक्ष निवडून येऊ शकत नाहीत. आमची ताकद आम्ही दाखवून देऊ, असाही सामंत यांना इशाराही दिला आहे. याकडे सामंत यांनी दुर्लक्ष करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना हे तिन्ही पक्ष वेगळे लढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येथे जागांचे विभाजन टळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढविण्याची संधी ज्या त्या पक्षांच्या कार्यकत्यांना मिळणार आहे. त्यामुळेच कदाचित शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांकडून स्वबळाच्या नारा दिला जात आहे. पण राज्यातील नेते युतीबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

Kokan Politics
Kokan Politics : राज-उद्धव ठाकरेंचे युतीचे संकेत; कोकणात सर्वात जास्त फटका शिंदेंनाच बसणार!

FAQs :

प्र.1: नितेश राणे यांनी काय विधान केले?
उ.1: राणे यांनी रत्नागिरीत स्वबळावर निवडणुकीचा नारा दिला.

प्र.2: उदय सामंत यांची भूमिका काय आहे?
उ.2: शिवसेनेचा सन्मान नसेल तर स्वतंत्र लढू, मात्र स्थानिक निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

प्र.3: या वक्तव्यांचा परिणाम काय झाला?
उ.3: महायुतीत तणाव निर्माण झाला असून जिल्ह्यात राजकीय तापमान वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com