
Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातून विस्तवही जात नाही. आता याच भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही कट्टर विरोधकांमध्ये 'लॉटरी'चं राजकारण पेटलं आहे.गणेश नाईकांनी शिंदेंची मुख्यमंत्री पदाची लॉटरी काढल्यानंतर आता शिवसेनेकडूनही गणेश नाईकांना मुकेश अंबानींचं नाव घेत शिवसेनेकडून पालकमंत्री पदाच्या लॉटरीची आठवण करुन देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, गणेश नाईक म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली.माझं त्यांना सांगणं आहे की,तुम्हाला पालकमंत्री पदाची लॉटरी मुकेश अंबानीमुळं लागल्याचं खोचक टोलाही लगावला आहे.
तसेच मुकेश अंबानीमध्ये पडले नसते, तर नाईकांनी पालकमंत्री हे पद मिळालं नसतं, असा पलटवार चौगुलेंनी यावेळी नाईकांवर केला आहे. यंदाच्या निवडणुकीच नवी मुंबईत पालिकेत असणारी आमची ताकद दाखवून देऊ, असं आव्हानही विजय चौगुले यांनी नाईकांना दिलं आहे.
विजय चौगुले यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात आम्ही 12 महिने निवडणुकीला तयार असतो, त्यामुळं यंदा हंडीवर पालिका निवडणुकीची छाप आहे, असं म्हणता येणार नसल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं.
तर शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांचं (Ganesh Naik) वय झालंय,त्यामुळे ते आम्हाला लॉटरी लागली म्हणत असतील. परंतू, एकनाथ शिंदे यांना कधीही लॉटरी लागली नाही. त्यांनी मेहनतीने सगळं मिळवल्याचं प्रत्युत्तर म्हस्के यांनी नाईकांना दिलं.
याचवेळी नरेश म्हस्के यांनी 40 जणांना सोबत घेऊन जाण्याची हिंमत केवळ एकनाथ शिंदे यांच्यातच असल्याचे कौतुकोद्गारही काढले.पण आता गणेश नाईकांचं वय झालं असल्यामुळे अशाप्रकारची वक्तव्यं ते करत असल्याचा हल्लाबोलही म्हस्के यांनी केला आहे.
आगामी पालिका निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत.समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील आमच्याशी संपर्क साधल्याचं म्हस्के यांनी सांगत मोठा नाईकांवर बॉम्ब टाकला आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचतानाच प्रत्येकाला लॉटरी लागत नाही. परंतु,शिंदे यांना लॉटरी लागली. ते मुख्यमंत्री झाले,त्याचा आनंद आहे. पण कमावलेले टिकवता आले पाहिजे. किती कमावलं, कसं कमवलं, पण कसं टिकवलं हेच जनसामान्यांच्या ध्यानात राहतं, असा खोचक टोलाही नाईकांनी शिंदेंना लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.