MP Shrirang Barne Latest News
MP Shrirang Barne Latest News Sarkarnama
पुणे

शिंदे गटात गेलेले खासदार बारणे यांच झालं प्रमोशन

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांची शिंदे गटाच्या उपनेतेपदी आज (ता.१६ सप्टेंबर) निवड झाली आहे. ही नियुक्ती करत बारणेंवर आता संघटनेची व राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे त्यांचा पिंपरी-चिंचवड शहर व मावळातील शिवसेना पदाधिका-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (MP Shrirang Barne Latest News)

याबाबत बोलतांना खासदार बारणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करीन. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्यनेते मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार ही नेमणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. याव्दारे पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच राज्य सरकारच्या योजना शिवसैनिकांमार्फत जनतेपर्यंत पोहचवून सत्तेचा फायदा त्यांना मिळवून देईन आणि शिवसैनिक सक्षम करण्याचा प्रयत्न देखील करेन,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत (ठाकरे) उपनेते होते. मात्र शिंदे गटात गेल्यावर त्यांना त्यांचं शिवसेनेतील उपनेतेपद मुख्यमंत्री शिंदे यांनी कायम ठेवले असून शिंदे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आढळराव यांच्यानंतर आता मावळचे खासदार बारणेंची देखील उपनेतेपदी वर्णी लागल्याने शहराचा दुसरा नेताही आता उपनेता झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT