Baramati : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा त्यांचे समर्थक नेहमीच व्यक्त करीत असतात. भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांचे बॅनरही अनेक वेळा झळकले आहेत. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही अनेकांची इच्छा आहे. आज हीच इच्छा त्यांच्या आई आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.
काटेवाडी (बारामती) येथे आज (रविवारी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. या वेळी मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार व पत्नी सुनीता पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी साडेसातच्या दरम्यान हजेरी लावली होती. आशा पवार यांनीच येथे प्रथम मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
"दादा मुख्यमंत्री कधी व्हावेत असे आपणास वाटते, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे मला मनापासून वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे पण बघू काय होते पुढचे काय सांगावे," असेही आशा पवार या वेळी म्हणाल्या.
"माझे वय आता ८६ आहे. त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे. मात्र, पुढचे काय सांगावे. बारामतीकरांचे काटेवाडीकरांचे दादावर प्रेम आहे, पण बघू पुढे काय होते," असे आशा पवार म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने प्रथमच ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला हजर राहू शकले नाहीत.
पूर्वीची काटेवाडी आणि आताच्या काटेवाडीमध्ये खूप बदल झाला आहे. माझ्या सूनबाईने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा बदल घडवला, असे त्या म्हणाल्या. काटेवाडी ग्रामपंचायतीवर अजितदादांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु या वर्चस्वाला आता सत्तेत एकत्र असलेल्या भाजपकडून आव्हान दिले आहे. परंतु गावातील लोक आपल्या सोबतच आहे. आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.