Rohit Pawar: विखेंचा पत्ता कट करण्यासाठी भाजपचा हा डाव ? रोहित पवारांना शंका

Maharashtra Politics : विखे पाटलांचा पत्ता भाजप कट करण्याच्या मनस्थितीत आहे.
Maharashtra Politics News
Maharashtra Politics NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai:शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे, काही तालुक्यांत पाऊस कमी झाल्यानंतरही या तालुक्यांना वगळण्यात आले असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यात एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या जिल्ह्यालाच दुष्काळी तालुक्यातून वगळल्याने रोहित पवारांना विखे पाटलांचा पत्ता भाजप कट करण्याच्या मनस्थितीत असल्याची शंका उपस्थित केली आहे. रोहित पवारांनी टि्वट करीत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राजकीय दृष्टीने विचार करायचा तर दुष्काळ जाहीर केलेले ४० पैकी ९५ टक्के तालुके हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. नगर जिल्ह्याचा विचार केला तर आजच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना आणि खुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांचा जिल्हा असतानाही एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. कदाचित भावी मुख्यमंत्री म्हणून महसूलमंत्र्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, त्यामुळं त्यांचा पत्ता परस्पर कट करण्याचा तर हा कट नसावा ना? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुष्काळातही असं राजकारण केलं जात असेल, तर ते चुकीचं आहे. सरकारने कोणताही भेदभाव न करता वस्तुस्थिती तपासून तातडीने दुष्काळ जाहीर करून शैक्षणिक शुल्कमाफीसह योग्य त्या उपाययोजना कराव्यात, ही विनंती! अन्यथा या दुष्काळातही राजकारण केल्यास लोकांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यावी, असा सल्ला पवारांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.

Maharashtra Politics News
Maratha Reservation : विद्यार्थ्यानं चक्क उत्तरपत्रिकेत लिहिलं 'एक मराठा कोटी मराठा'

रोहित पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात,"वस्तुस्थितीकडं दुर्लक्ष करत केवळ तांत्रिक बाबींचाच आधार घेऊन राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केला. नगरसह अकोला, परभणी, नांदेड, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांतील एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही, तर काही जिल्ह्यातील एखाद-दुसऱ्या तालुक्याचा समावेश केला आहे. दुष्काळाचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या जत तालुक्यातही दुष्काळ जाहीर न करणं, हे अनाकलनीय असून राज्य सरकारला शोभणारं नाही."

Maharashtra Politics News
Dr. Chitra Kurhe : एका चुकीमुळं फॉरेन रिटर्न महिलेनं सरपंचपद गमावलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com