Kolhapur : राज्यात आज (रविवार) २ हजार ३६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मतदानास सर्वत्र सुरुवात झाली आहे. 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान हाेत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 86 ,तर सांगलीत जिल्ह्यातील 83 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जवळपास तीन हजार उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीत कैद होणार आहे. त्यामुळे आज गाव-गाड्यातील वातावरण तापणार असून, सोमवारी गावचा पुढारी ठरणार आहे.
मागील आठ दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान होणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. गेल्या महिनाभरात उमेदवार कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील वाडी-वस्त्या पिंजून काढल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १२ ग्रामपंचायतींसाठीच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सोमवारी मतमोजणी होणार
आहे. या निवडणुकांसाठी 1 हजार 540 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 1 हजार 382,
सरपंच पदासाठी 192 व 74 पोटनिवडणुकीसाठी 66 निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगली जिल्हातील 94 ग्रामपंचायतीपैकी 13 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले. तसेच ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ८१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २१८, तर सदस्यपदांसाठी ६६३ जागांसाठी एक हजार 512 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील नागदेववाडी येथील प्रभाग क्रमांक २ मधील अपात्र झालेल्या सदस्याच्या रिक्त एका जागेसाठी आज (रविवारी) निवडणूक होणार होती, पण उच्च न्यायालयाने पुणे आयुक्तांचा पात्र-अपात्रेचा अंतिम निकाल येईपर्यंत या पोटनिवडणुकीला स्थगिती दिली. निवडणूक लावल्याने उमेदवारांसह ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला असून, निवडणूक अधिकारी ग्रामसेविका अश्विनी पाटील यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.