Rape_Crime News Sarkarnama
पुणे

Ashadhi Wari 2025: वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचा फोटो आला समोर; पोलिसांची दहा पथकं रवाना

Ashadhi Wari 2025: पंढरपूरला निघालेल्या या कुटुंबातील महिलांचे दागिने ओरबाडून आरोपींनी त्यांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.

Sudesh Mitkar

Ashadhi Wari 2025: पुणे जिल्ह्यातील दौंड जवळ पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या कुटुंबातील महिलांच्या अंगावरील दागिने लुटणाऱ्या आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीवर कोयत्याचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचे फोटो समोर आले आहेत. त्यानुसार या आरोपींना पकडण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसांची दहा वेगवेगळी पथक तैनात करण्यात आली आहेत.

पहाटे साडेचारच्या सुमारास दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात 30 जून रोजी ही घटना घडली होती. आपल्या खासगी वाहनातून निघालेलं पीडित कुटुंब पहाटेच्या सुमारास चहा पिण्यासाठी एक टपरीवर थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनानी या कुटुंबातील महिलांच्या डोळ्यात मिरपूड टाकली आणि त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. तसंच या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं टपरीच्या मागे घेऊन जात या नराधमांनी लैंगिक अत्याचार केला होता. पण लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. या धक्कादायक घटनेच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला.

दौंड : चिंचोली इथं पंढरपूरला निघालेल्या एका कुटुंबाचे दागिने लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं पोलिसांनी काढलेलं स्केच.

दरम्यान, दौंड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यासाठी दहा पथकं रवाना केली आहेत. तसंच पीडित कुटुंबांशी बोलून आरोपींचे स्केच तयार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही पुण्यात वारकरी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या एका महिलांच्या टोळीला अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT