Pune District Superintendent of Police Sandeep Gill sarkarnama
पुणे

Ashadhi Wari route : वारी मार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांवर वारीच्या कालावधीत मद्य अन् मांसविक्रीस पूर्णतः बंदी!

Alcohol, Meat Sale Ban on Wari Route - जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिले असून, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी याबाबत पत्रकार पत्रकारपरिषदेत माहिती दिली आहे.

Sudesh Mitkar

Ashadhi Wari 2025 Pune News – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासंदर्भात पुणे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीच्या मार्गावरील हॉटेल्स व ढाब्यांवर वारीच्या कालावधीत मद्यविक्री व मांसविक्रीस पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "वारीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारची अपवित्रता होऊ नये आणि वारीची पारंपरिक भक्तिभावना अबाधित राहावी, यासाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे. बंदीची अंमलबजावणी काटेकोर व्हावी यासाठी स्थानिक पोलिस व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत." वारी दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने विविध पातळीवर व्यापक उपाययोजना आखल्या आहेत:

१. वाहतूक नियंत्रण आणि वळवण योजना -

पालखी मार्गांवर गर्दीचा विचार करता वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून एकूण १२ ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आले आहे. या ठिकाणी विशेष पोलिस अधिकारी आणि वाहतूक अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. जड व अनावश्यक वाहनांची ये-जा प्रतिबंधित करण्यात आली असून, वाहतुक सुरळीत राखली जाणार आहे.

२. मद्य व मांसविक्रीवर बंदी -

पालखी मार्गावरील सर्व खाद्य पदार्थ व पेय विक्री करणाऱ्या ठिकाणी मद्य व मांसविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिले असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तपासणी मोहिमा राबवून नियमांचे पालन होत असल्याची खात्री केली जाणार आहे.

३. गुप्त माहिती संकलनासाठी विशेष पथके -

सुरक्षा व्यवस्थेसाठी १५ वरिष्ठ अंमलदारांच्या नेतृत्वाखाली ३० संयुक्त गुप्तचर पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक पोलीस स्टेशन आणि जिल्हा विशेष शाखांशी समन्वय साधून कार्यरत राहणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहणार आहे.

४. पालखी मुक्कामस्थळी विशेष बंदोबस्त -

वारीच्या मुक्कामस्थळी चोरी, भांडणे किंवा इतर गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT