Ashok Kharat Case Rupali Chakankar Vs Rupali Patil sarkarnama
पुणे

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर फरार, राष्ट्रवादीतील महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

Ashok Kharat Case Rupali Chakankar Vs Rupali Patil : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्यातच रुपाली पाटील यांनी चाकणकर फरार असल्याचा दावा केला आहे.

Roshan More

Rupali Patil News : अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे. खरात याने महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे.

दरम्यान,खरात याच्यासोबत चाकणकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या खरातच्या संस्थेवर संचालक देखील असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील यांनी रुपाली चाकणकर फरार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

रुपाली पाटील यांनी फेसबूकवर 'राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षारूपाली चाकणकर फरार.बजाव टाली.', अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ही पोस्ट उपाहासात्मक असल्याची चर्चा आहे. कारण महिलांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या चाकणकर यावेळी खरात यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतर शांत असल्याने पाटील यांनी चाकणकरांना टोला लगावला आहे.

रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. खरात याला चाकणकर मदत करतील, अशी भीती देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.

अत्याचाराच्या मुखिया

पाटील यांनी 'अभी बात निकली है तो बहोत दूर तक जाएगी भाई.संविधानिक पदावर असलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षाच निघाल्या अत्याचाराच्या मुखिया.चाकणकर प्रेमी बजाव टाळी.', अशी देखील पोस्ट फेसबूक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT