Ashok Kharat Case : 'रुपाली चाकणकरच अत्याचाराच्या मुखिया…','कॅप्टन' प्रकरणावरून रुपाली ठोंबरेंची जहरी टिका

Rupali Thombare Vs Rupali Chakankar : महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली आहे.
Rupali Thombare criticizes Rupali Chakankar over the Ashok Kharat case
Rupali Thombare criticizes Rupali Chakankar over the Ashok Kharat casesarkarnama
Published on
Updated on

Rupali Thombare News : नाशिकमधील अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी पेन ड्राईव्ह जप्त केला त्यामध्ये तब्बल 58 व्हिडिओ आहेत. अशोक खरात हा ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्याकडे मोठ मोठे राजकीय नेते येत होते. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

अशोक खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्या एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायर झाला आहे त्यामध्ये त्या अशोक खरात यांच्या डोक्यावर छत्री पकडून उभ्या आहेत.चाकणकर या खरातच्या संस्थेवर संचालक असल्याचा आरोप देखील अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील चाकरणकरांवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, 'अभी बात निकली है तो बहोत दूर तक जाएगी भाई. संविधानिक पदावर असलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षाच निघाल्या अत्याचाराच्या मुखिया.चाकणकर प्रेमी बजाव टाळी.'

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहे की,'पदाचा वापर ना समाजासाठी,ना घटनेचे सत्य बाहेर येण्यासाठी. फक्त आणि फक्त पदाचा गैरवापर, दिखावाचआणि दिलेल्या पदाच्या विभागाचे वाटोळे. इतक्या दिवस अजितदादा होते म्हणून संयमाने घेतले होते पण आता नाही आता विकृतीला जशास तसे उत्तर.'

Rupali Thombare criticizes Rupali Chakankar over the Ashok Kharat case
Sushma Andhare Allegations Rupali Chakankar : राजकारण्यांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सुषमा अंधारे यांचे चाकणकरांकडे बोट; काय आहे प्रकरण?

'वैष्णवी हगवणे,संपदा मुंडे प्रकरणात राज्य महिला आयोगावर असून महिलांनावर अन्यायकारक बोलण्यात आले.खर तर तातडीने पदावरून पायउतार व्हावे.जनाची नाही मनाची लाज सोडलेले लोक.', असे देखील रुपाली ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

चाकणकरांनी राजीनामा द्यावा

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात, इतर महिलांना संविधान वाचण्याचे उपदेश देतात. दुसरीकडे भोंदू बाबाचे पाय धुतात हेच का यांचे पुरोगामीत्व ? हीच का यांची संविधानावरील श्रद्धा ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

Rupali Thombare criticizes Rupali Chakankar over the Ashok Kharat case
Rupali Chakankar News : बलात्कारप्रकरणी अटक केलेल्या अशोक खरातच्या संस्थेशी थेट संबंध, पाद्यपुजेचा व्हिडीओही समोर; रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com