Vinayak Mete  Sarkarnama
पुणे

Vinayak Mete: दिवंगत विनायक मेटेंचा पुण्यातील फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, प्रकरण काय ?

Ganesh Thombare

Pune News: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांचा पुण्यातील विमाननगर परिसरातील फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात विनायक मेटे यांच्या मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, विनायक मेटे यांची बहीण व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमाननगर परिसरातील फ्लॅटची मालकी आमच्या ताब्यात आहे. मात्र, या फ्लॅटचे लॉक तोडून आत्याने (विनायक मेटे यांची बहीण आणि त्यांचा मुलगा) अनधिकृत ताबा घेतल्याचा आरोप करत विनायक मेटे यांच्या मुलाने तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास विमाननगर पोलिस करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकं प्रकरण काय ?

आशुतोष विनायक मेटे (वय 20,रा.कोरेगाव पार्क) याने पुण्यातील विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद देत आत्या सत्वशीला महादेव जाधव आणि आकाश महादेव जाधव (रा.पंचगंगा सोसायटी,ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. मेटे यांनी मृत्यूपूर्वी विमाननगर परिसरातील एका सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट मेटे यांनी बहीण सत्वशीला जाधव व भाचा आकाश जाधव यांना भेट दिला होता, असा दावा सत्वशीला महादेव जाधव आणि आकाश महादेव जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे.

तर या फ्लॅटचे कागदपत्रं मेटे यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT