Ajit Pawar | Jay Pawar  sarkarnama
पुणे

Ajit Pawar : लेकानं केलं दमदार भाषण, अजितदादांनी घेतली फिरकी; म्हणाले,'रात्रभर...'

Ajit Pawar reaction to Jay Pawar speech : अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी प्रचार सांगता सभेत भाषण केले. या भाषणानंतर अजित पवारांनी आपल्या भाषणात जय यांचा उल्लेख केला.

Roshan More

Jay Pawar First Speech: बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेत अजित पवारांचे पुत्र जय पवार भाषण केले. आपण पहिल्यांदाच भाषण करत असल्याचे जय यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाला चांगला प्रतिसादही मिळाला.विशेष म्हणजे जय यांच्या भाषणावर अजित पवार आपल्या भाषणात बोलले.

'आमच्या चिंरजीवाचे भाषण आम्ही ऐकले. म्हटलं अरे हा लय भारी बोलायला लागलाय. रात्रभर पाठ करत होता वाटतं, झोपला नाही पाठ केलेलं दिसतंय', अशी फिरकी अजित पवारांनी जय यांची घेतली.

अजित पवार म्हणाले, गमतीचा भाग सोडून द्या. मी प्रत्येक समाज घटकासाठी काम करतोय.तुम्ही मला 7 वेळ आमदार आणि 1 वेळा खासदार केलं. आता आठव्यांदा मी आमदारकीसाठी तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे. मी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो. '

ही गावकी भावकीची निवडणूक नाही. ही राज्याची निवडणूक आहे. राज्यात जी दहा नेत्यांची नावं घेतात त्यामध्ये अजित पवारांचे नाव घेतात. मला अल्पसंख्याक समाजाला सांगायचे आहे मी बारामतीमध्ये काम करायला लागल्यापासून कधीच कुठली दंगल होऊ दिलं नाही. काही जण अचनाक आले आणि वातावरण खराब करत आहेत. त्यामुळे सांगतोय हे बारामतीमधील गरीबांना परवडणार नाही.

जय पवार काय म्हणाले?

मी पहिल्यांदा अजितदादांच्या समोर भाषण करतोय. माझ्याकडून काय चूक झाली तर मला माफ करा. लोकसभेला जे झालं त्यामुळे काही कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणतात आम्हाला माफ करा. पण गावदौरे करताना तेव्हा लोक मला सांगत होतो. आमच्याकडे चूक झाली. मी त्यांना सांगितले कोणाची चूक नाही. प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याचा लोकशाही अधिकार आहे. बारामतीकरांचे अधिच ठरले आहे लोकसभेला साहेब म्हणजे ताई आणि विधानसभेला अजितदादा, असे जय पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT