Anil Deshmukh Attack : धक्कादायक! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर प्राणघातक हल्ला; भाजपवर केले गंभीर आरोप

Katol Constituency Assembly Election 2024 : या घटनेत हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.या घटनेमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Anil Deshmukh Attack
Anil Deshmukh AttackSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. या प्राणघातक हल्ल्यात काटोल या मतदारसंघात प्रचारासाठी गेले असता ही घटना सोमवारी (ता.18)घडली आहे.

या घटनेत हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.या घटनेमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघात मोठी धक्कादायक घटना घडली. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सायंकाळी प्रचार आटोपून येत असताना जलालाखेडा रोडवर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यातील एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

दगडफेक करणारे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांनी भाजपच्या घोषणा देऊन गाडीवर दगडफेक केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Sharadchandra Pawar) उमेदवारी दिली आहे.

Anil Deshmukh Attack
Eknath Khadse News : मोठी बातमी! एकनाथ खडसेंनी केली यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा

अनिल देशमुख हे सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी जलालखेडा परिसरातील एका गावात गेले होते. परत येत असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आले. गाडीच्या काचा उघड्या असल्याने एक दगड त्यांच्या डोक्याला लागला आहे. रक्तस्राव होत असल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयाच उपचारासाठी नेण्यात आले आहे. डोक्याला लागलेली जखम गंभीर नसली तरी मोठा रक्तस्राव झाला.

या दडफेकीवरून राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे. अनिल देशमुख यांचा हा निवडणूक स्टंट असल्याचा भाजपचा आरोप आहे. दगडफेक किंवा हल्ले करणारे घोषणाबाजी करीत नाहीत असे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पराभव समोर दिसत असल्याने मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी देशमुखांनी स्वतः हा हल्ला घडवून आणला असल्याचा भाजपचा आरोप आहे. द

Anil Deshmukh Attack
Solapur News : 'राम सातपुतेंचे स्टेट्‌स का ठेवले?'; आमदार समर्थकाला नातेपुत्यात मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली आहे. अद्याप या घटनेची पोलिस तक्रार करण्यात आली नाही. मात्र घटनेमुशे काटोल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला वेगळे वळण लागू शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com