Prashant Jagtap | Mahadeo Babar | Balasaheb Shivarkar  sarkarnama
पुणे

Hadapsar Vidhan Sabha: प्रशांत जगताप यांच्या विरोधात बंड? हडपसर विकास आघाडीने थोपटले दंड

Hadapsar Vikas Aghadi: माजी आमदार महादेव बाबर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी ८ नगरसेवकांनी एकत्र येत हडपसरमध्ये विकास आघाडी तयार केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील इच्छुक बंडाच्या तयारीत आहेत.

बाहेरचा उमेदवार आमच्यावर थोपवण्यात आला असून उमेदवार न बदलल्यास हडपसर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा इशारा या नेत्यांनी दिला आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातू महाविकास आघाडीचे तिकीट मिळावे, यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसकडून माजी आमदार बाळासाहेब शिवरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजी नगरसेवक योगेश ससाने इच्छुक होते. मात्र प्रशांत जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.यानंतर माजी आमदार महादेव बाबर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी ८ नगरसेवकांनी एकत्र येत हडपसरमध्ये विकास आघाडी तयार केली आहे.

या माध्यमातून आज (रविवारी) काही माजी नगरसेवकांनी मुंबईत जाऊन खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचा उमेदवार बदलावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. उमेदवार फेर विचाराचा प्रस्ताव यावेळी या माजी नगरसेवकांकडून अमोल कोल्हेना देण्यात आला आहे. अमोल कोल्हे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असून ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचं या नेतेमंडळीतून सांगण्यात आले आहे.

दरम्यान हडपसर मधून उमेदवारीचा फेर विचार झाला नाही तर, हडपसर विकास आघाडीचा प्रयोग यावेळी होणार असल्याचं या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच उद्यापर्यंत वाट पाहून परवा दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी देखील करण्यात आली असल्याचे म्हटले.

काय आहे हडपसर विकास आघाडी?

2002 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिलीप तुपे व दत्तोबा ससाने यांनी हडपसर विकास आघाडी नावाने पॅनल उभे केले होते व तो प्रयोग यशस्वी झाला होता. त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे विकास आघाडी स्थापन करून विधानसभेसाठी एक उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT