Kinwat Assembly Constituency: किनवट-माहूर मतदार संघात वंचित आघाडीने उमेदवार बदलला

Vanchit Bahujan Aghadi: पक्षाने या मतदारसंघातून आधी प्रा. विजय खुपसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यांच्याऐवजी डॉ.पुंडलिक आमले माळबोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Kinwat Assembly Constituency
Kinwat Assembly Constituencysarkarnama
Published on
Updated on

साजीद खान

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 आॅक्टोबर आहे. त्यामुळे आतापर्यंत रखडलेल्या महायुती-महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या उमेदवारी याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत.

वेगवान घडामोडींना गती आलेली असतानाच काही मतदारसंघात ऐनवेळी आधी जाहीर झालेले उमदेवार बदलण्याचे प्रकारही घडत आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आधी जाहीर केलेल्या उमेदवाराची उमेदवारी बदलली आहे.

पक्षाने या मतदारसंघातून आधी प्रा. विजय खुपसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यांच्याऐवजी डॉ.पुंडलिक आमले माळबोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Vanchit Bahujan Aghadi) या निर्णयाने वंचित आघाडीच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे आधी उमेदवारी जाहीर झालेल्या खुपसे यांनी मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू केला होता. आता त्याला ब्रेक लागणार आहे.

वंचीत आघाडीने किनवट-माहूर मतदारसंघात आदिवासी (आंध) समाजाचा चेहरा म्हणून प्रा.विजय खूपसे यांना उमेदवारी दिली होती. खूपसे यांनी प्रचाराला सुरवातही केली, मात्र आज अचानक त्यांच्या जागी डॉ.पुंडलिक आमले माळबोरगावकर या तरुण उमेदवाराला मैदानात उतरवण्यात आले आहे. किनवट-माहूर मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आदिवासी, दलित व मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार इथे प्रभावी ठरू शकतो, अशी परिस्थिती आहे.

Kinwat Assembly Constituency
Vanchit Bahujan Aaghadi Candidates : प्रकाश आंबेडकरांकडून 10 उमेदवार जाहीर; सांगली, कल्याण, औरंगाबादचा समावेश

हे लक्षात ठेवूनच वंचितने भाजपच्या भीमराव केराम यांच्याविरोधात विजय खूपसे यांना उमेदवारी दिली होती. पण ऐनवेळी आता ती बदलण्यात आल्याने खुपसे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. डॉ. पुंडलिक आमले हा तरूण चेहरा पक्षाने पुढे केला आहे. (Nanded) ते या निवडणुकीत चमक दाखवतात का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे. ऐनवेळी उमेदवार बदलल्यामुळे सोशल मिडियावर मात्र या निर्णयाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

स्वपक्षाला बॅकूटवर नेण्याचा हा निर्णय आहे, वंचितने काय साध्य केले? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान किनवट-माहूर मतदारसंघात विद्यमान आमदार भीमराव केराम हे महायुतीचे उमेदवार आदिवासी समाजातुन येतात. त्यामूळे खूपसे आणि त्यांच्यात चांगली लढत होईल, असे बोलले जात होते. आता खुपसे यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर वंचित ने केलेला बदल कितपत यशस्वी ठरतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Kinwat Assembly Constituency
Nanded Political News : महायुतीत श्रेयवादाची लढाई, भाजप आमदाराच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

वंचित ने उमेदवार नेमका कोणत्या कारणामुळे बदलला याविषयी वंचित चे प्रवक्ते प्रा.हमराज उईके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकले नाही. वंचीत बहुजन आघाडीची लोकसभेतील कामगिरी पाहता यावेळी विधानसभा निवडणुकीत किनवट-माहूर मतदारसंघात त्यांच्या मतांच्या टक्क्यात वाढ होऊन आदिवासी समाजातील उमेदवार विजयी होऊ शकतो, अशी गणित मांडण्यात आले होते. आता हे गणित ऐनवेळी कसे बदलले? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com