Pathri Assembly Constituency: जरांगे पाटलांचा आदेश पाळणार, 26 इच्छुकांनी हातात ज्वारी घेऊन शपथ घेतली

Manoj Jarange News: एकजुटीने काम करण्याच्या हेतूने आज सगळ्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली. यात उमेदवारी कोणालाही मिळो किंवा जरांगे पाटील जो आदेश देतील तो अंतिम मानून काम करण्याचा निर्णय झाला.
Pathri Assembly Constituency News
Pathri Assembly Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

धनंजय देशपांडे

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील देतील त्या उमेदवारांचे काम निष्ठेने करू, त्यांचा आदेश अंतिम मानू, अशी शपथ रविवारी (ता.27) इच्छुक उमेदवारांनी हातात ज्वारी घेऊन घेतली. विधानसभा निवडणुकीत आपल्या हक्काचा माणूस उभा करून निवडून आणायचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर विधानसभेच्या पाथरी मतदारसंघातील 26 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती.

यात माजी आमदार, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. (Manoj Jarange Patil) जरांगे पाटलांनी शुक्रवारी `उमेदवार तुम्हीच ठरवा`, असे सांगितल्यानंतर इच्छुकांत संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान एकजुटीने काम करण्याच्या हेतूने आज सगळ्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली. यात उमेदवारी कोणालाही मिळो किंवा जरांगे पाटील जो आदेश देतील तो अंतिम मानून काम करण्याचा निर्णय झाला.

यावेळी उपस्थित इच्छुकांनी हातात ज्वारी घेऊन शपथ घेतली. आजच्या बैठकीला 26 इच्छुकांपैकी बापू कोल्हे, अभिजीत कदम, अर्जुन पाटील, प्रा. नितीन लोहट, अॅड. बालासाहेब पौळ, डॉ.जगदीश शिंदे, डॉ.राम शिंदे, मंचकराव बचाटे, किरण शिंदे, दादासाहेब टेंगसे, अरुण कोल्हे ,माजी आमदार मीराताई रेंगे यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीनिवास रेंगे, गोविंद घांडगे, अमोल भिसे, मुंजाभाऊ कोल्हे, नारायण अवचार,डॉ. राजेंद्र कोल्हे यांची उपस्थिती होती.

Pathri Assembly Constituency News
Manoj Jarange Patil Video : 'इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार', मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरविण्याच्या अनुषंगाने सोमवारी (ता.28) सर्व इच्छुक उमेदवार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मराठा सेवकांनी दिली आहे. (Maratha Reservation) पाथरीतील इच्छुकांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत होत आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटीत दररोज शेकडो इच्छुक उमेदवारीसाठी भेटत आहेत.

प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपापसात चर्चा करुन उमेदवार तुम्हीच ठरवा आणि मला एकाचे नाव सांगा, अशी भूमिका घेतली. यावर पाथरीतील इच्छुकांनी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांचा आदेश पाळण्याचे मान्य केले. तसेच जो उमेदवार दिला जाईल त्याचे सगळ्यांनी काम करण्याची शपथ घेतली. पाथरीतील या इच्छुकांचा आदर्श राज्यातील इतर इच्छुक घेणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com