Car abandoned on Atal Setu bridge: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूवरून एका 28 वर्षीय युवकाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस, सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांकडून युवकाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
उलवे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तीच्या नोंदीनुसार, प्रतिक सुभाष रासकर (वय 28) हा युवक रविवारी (7 जून) मध्यरात्रीनंतर अटल सेतू पुलावरून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी उलवे पोलिस (Police) ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक रासकर हा पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. घटनेपूर्वी त्याने कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो घराबाहेर पडला. मात्र काही वेळानंतर त्याने आपली कार अटल सेतूवर उभी करून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर आली.
प्रतिक रासकर याचे वर्णन देताना पोलिसांनी सांगितले की, त्याचा रंग गोरा, शरीरयष्टी मजबूत, उंची सुमारे 5 फूट 10 इंच, काळे वाढलेले केस, काळे डोळे तसेच वाढलेली दाढी-मिशी आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलत होता.
घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र समुद्रात उडी घेतल्यानंतर युवकाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे सागरी सुरक्षा यंत्रणा, बचाव पथके आणि पोलिसांकडून परिसरात कसून शोध सुरू आहे.
या घटनेमुळे रासकर कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिक रासकर याबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ उलवे पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, अटल सेतूवरून उडी मारण्याच्या घटनांमुळे पुलावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना, देखरेख यंत्रणा आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज असल्याची मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.