Maharashtra ATS conducts search operation in Pune’s Kondhwa area; several people detained for questioning. sarkarnama
पुणे

ATS Search Operation Video : पुण्यात दहशतवादी घुसले? एटीएस, पुणे पोलिसांचे कोंढव्यात सर्च ऑपरेशन!

ATS Pune Police Search Operation : बुधवारी मध्यरात्रीपासून पुणे शहरातील कोंढवा परिसरात एटीएसकडून सर्च ऑपरेशन राबण्यात आल्याची माहिती आहे. काही जणांना ताब्यात घेतल्याचे देखील सांगितले जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादी असल्याच्या संशयाने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीपासून राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने शहरातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले.या कारवाईत तब्बल 18 संशयित व्यक्तींचा शोध घेतला असून, काहींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे. कोंढवा परिसरात ही कारवाई रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत गुप्तपणे चालू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मोहीम संशयितांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता आहे. कोंढवा परिसरात संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते.

दोन वर्षांपूर्वीच्या कोंढवा भागात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्या तिघांच्या माध्यमातून देशव्यापी संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात आला होता. आता पुन्हा त्याच भागात संशयितांचे जाळे सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील कोंढवा परिसर दोन वर्षांपूर्वी (२०२३ मध्ये) पोलिसांनी इथे आयसीसशी संबंधित तीन संशयितांना अटक केली होती. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, ड्रोन मटेरिअल आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्या संशयितांनी पश्चिम घाटातील जंगलात बॉम्ब चाचण्या घेतल्याचा आरोप होता. या घटनेनंतर कोंढवा परिसरावर तपास यंत्रणांचे विशेष लक्ष केंद्रित झाले.

२०२४ मध्ये एटीएसने इथे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा भंडाफोड करून ३,७८८ सिमकार्ड जप्त केली होती. त्या प्रकरणातही दहशतवादी संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या नेटवर्कचा संशय होता.

कोंढवा परिसरातील घनदाट वस्ती आणि मजूर वस्त्या यामुळे संशयितांना लपण्यास सोयीचे ठरतात. या भागात बांगलादेशी घुसखोर आणि इतर संशयितांचे जाळे सक्रिय असल्याची माहिती पूर्वीच समोर आली होती. दरम्यान बुधवारी मध्यरात्री १२ नंतर सुरू झालेली ही मोहीम गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चालू होती. कोंढवा काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी १८ संशयितांचा शोध घेण्यात आला यापैकी काहींना ताब्यात घेतले. कारवाईपूर्वी मोठी गुप्तता बाळगण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT