Mumbai News, 09 Oct : पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड निलेश घायवळ सध्या परदेशात फरार झाला आहे. त्याला देशातून बाहेर जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळाला आणि कोणी दिला? यावरुन वाद सुरू असताना आणि अनेक राजकीय नेते संशयाच्या भोवऱ्यात असतानाच आता त्याच्या भावाला चक्क राज्याच्या मंत्र्याच्या सहीने शस्त्र परवाना दिल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर राज्यभरातून मंत्री कदम यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. अशातच आता गृहराज्यमंत्र्यांनी आपण निलेशचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना का आणि कधी दिला याबाबतच स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कमद यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते.
उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.', असं गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पुणे पोलिसांच्या विरोधानंतरही मंत्री योगेश कदम यांच्या सहीने सचिन घायवळला 20 जून रोजी शस्त्र परवाना देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळवर यााधी गंभीर गुन्हे दाखल असतानाही शस्त्र परवाना देण्यात आला होता. त्यावर आता गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
मात्र, चक्क गृहमंत्र्यांमुळे गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना मिळाल्याच्या बातमीमुळे अनेकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकीय नेत्यांच्या आश्रयामुळेच असे गुंड आपल्या टोळ्या चालवतात आणि सर्वसामान्यांना त्रास देतात. त्यामुळे आता सामान्य जनतेने कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.