Pune News, 06 Mar : साथ रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पुण्यात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (MSU) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जागा ही निश्चित करण्यात आली होती. पण भाजपच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये उपसूचना देऊन जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पालाच खो घातला आहे.
त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे तब्बल 8 कोटी रुपयांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. केंद्राच्या प्रकल्पाल अडथळा होत असताना यास भाजपच्या एकाही नगरसेवकाने हरकत घेतली नाही.
मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटसाठी राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांची निवड झाली आहे. हा नियंत्रण कक्ष शहराच्या मध्यभागी असले पाहिजे यासाठी कुंभारवाडा येथील कै. तुकाराम हरिभाऊ जावळे भवन येथे जागा निश्चित केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या बैठका घेतल्या होत्या. सध्या या कक्षासाठी 16 कर्मचारी काम करत असून, तेथे आठ कोटी रुपयांची कामे करून पुढील 6 महिन्यात हे युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जाणार होते. त्यासाठी खर्चाची निविदा आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी आलेली होती.
मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटसाठी आठ कोटी रुपयांच्या दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदांना आज मान्यता देण्यात आली. पण त्यावेळी विशाल धनवडे यांनी उपसूचना देऊन जावळे भवन येथील हे युनिट अन्य ठिकाणी बदल करण्याची मागणी केली. महापालिका प्रशासनाने हे युनिट कसे महत्त्वाचे आहे, केंद्र सरकारचा निधी आहे, तो योग्य वेळेत वापरला नाही तर निधी परत जाऊ शकतो अशी माहिती देण्यात आली.
पण तिचा विचार न करता थेट जागा बदलाचा निर्णय घेण्यात आला. तर स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितलं की, "जावळे भवन येथे क्षेत्रीय कार्यालय होत असल्याने मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटचे अन्य ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी नगरसेवकांची मागणी होती. त्यामुळे ही उपसूचना मान्य केली. या युनिटसाठी इतरत्र जागा शोधण्यास सांगितले आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.