Governor Appointments India : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह देशातील इतर ९ राज्यांच्या राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी केलेल्या नियुक्तीनुसार सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
या नव्या राज्यपालांच्या नियुक्तीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले असून या सर्व राज्यपालांचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे. दरम्यान, देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे सीपी राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता.
त्यांच्या राजीनाम्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या अतिरिक्त राज्यपाल पदाचा कार्यभार सोपवला होता. त्यानंतर आता जिष्णू देव वर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. वर्मा हे त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री होते. तसंच त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाची जबाबदारी होती.
महाराष्ट्रास देशभरातील विविध राज्यांत राज्यपालांच्या नियक्त्या करण्यात आलेल्या आहेत. तर राज्यपालांसह केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारने मोठे फेरबदल केले आहेत. ते पुढीलप्रमाणे -
(१) जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती.
(२) शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाच्या राज्यपाल पदी नियुक्ती.
(३) नंद किशोर यादव यांची नागालँडच्या राज्यपाल पदी नियुक्ती.
(४) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपाल पदी नियुक्ती.
(५) आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदी नियुक्ती.
(६) राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपाल पदी नियुक्ती.
(७) कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती.
(८) विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती.
(९) दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून तरनजित सिंग संधू यांची नियुक्ती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.