Babanrao Shinde- Ashok Pawar -Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar PC : बबनदादा, अशोक पवारांच्या भेटीचे अजित पवारांनीच सांगितले कारण....

Babanrao Shinde, Ashok Pawar Meet Ajit Pawar : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संर्दभात बैठक घेतली. दोन्ही कारखाने सध्या बंद आहेत. ते सुरु होण्यासाठी बैठक घेतली.

Vijaykumar Dudhale

Pune, 09 January : शिरूरचे माजी आमदार ॲड अशोक पवार आणि माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, त्या भेटीबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, साखर कारखान्यांचे प्रश्न राजकारण न करता सोडविले जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बबनराव शिंदे आणि अशोक पवार या दोन्ही माजी आमदारांच्या भेटीबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संर्दभात बैठक घेतली. दोन्ही कारखाने सध्या बंद आहेत. ते सुरु होण्यासाठी बैठक घेतली.

माजी आमदार ⁠बबनदादा शिंदेही आले होते. मी त्यांना बोलावले होते. ⁠राजकारण न करता साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, पीएमपीएलसाठी २०० नवीन टाटाच्या बस घेण्याचा निर्णय आज घेतला आहे. माध्यमांशी बोलण्यासाठी मी बैठका थांबवून आलो आहे. मी परत जाणार आहे, त्यात पुण्यातील गुन्हेगारीवर चर्चा करणार आहे.

⁠पुणेकरांचे वाहतुकीचे प्रश्न फार जटील बनले आहेत. त्या संदर्भात महापालिका, पोलिस यांची बैठक घेतली. ⁠पिंपरी चिंचवड महापालिकेची मिळकत कर आणि कचरा या संदर्भात बैठक घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार काय म्हणाले?

संतोष देशमुख खूनप्रकरणी एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी सुरू आहे. जो कोणी दोषी आहे, हे सिद्ध झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. पक्ष न बघता जो कोणी दोषी असेल तर कोणाचीही गय करण्याची आवश्यकता नाही, हे मी मुख्यंत्र्यांना सांगितले आहे. अशा घटना आम्ही खपवून घेणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT