
Nagpur, 09 January : मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने महायुतीलमधील अनेक नेते नाराज आहेत. ते आपली नाराजी वारंवार जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. काही नेते आवडते खाते मिळाले नाही; म्हणून अस्वस्थ आहेत. मात्र, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यास अपवाद आहेत. ते म्हणातात, मी शंभर टक्के मंत्री होणार आहे. मंत्रिपद माझ्या नशिबात आहे. आतापर्यंत चार वेळा मी निवडून आलो आणि चारही वेळा मंत्री झालो, असे सांगून त्यांनी अडीच वर्षे प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. सर्वांना संधी मिळावी, याकरिता आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. असे असले तरी माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ऐकायला तयार नाहीत. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशन सोडून निघून गेले. समर्थकांचा मेळावा घेतला. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचीही भेट घेतली.
भुजबळ यांच्या नाराजीवर धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) म्हणाले, भुजबळांची नाराजी स्वाभाविक आहे. मी अजित दादांसोबत मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. अडीच वर्ष थांबायचे ठरवले आहे. तोपर्यंत पक्ष संघटनेचे काम सुरू आहे. राष्ट्रवादील मजबूत करून गडचिरोली जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडणुकीत केलेला प्रचाराचे कौतुक केले. ते योग्यच आहे. मात्र, ते महायुतीत येतील असे वाटत नाही. शरद पवार यांनी आमच्यासोबत यावे, हे सगळ्यांचे मत आहे. त्यामुळे पक्ष मजबूत होईल. महाराष्ट्रात आणि दिल्लीत ताकद वाढेल.
शरद पवार यांचे मत परिवर्तन होऊन ते आमच्याकडे आले तर विकासकामे करण्यासाठी फायदा होईल. केंद्राचा निधी मिळेल, सत्तेत आल्यास फायदा होईल. खासदार असून विरोधात राहून फायदा नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास महाराष्ट्रात आणि देशात एक प्रकारची क्रांती होईल, असेही आत्राम म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. ते पालकमंत्री झाल्यास गडचिरोली जिल्हा मानयनिंग हब होण्यास फायदा होईल. संजय राऊत यांच्याबाबत मी काही जास्त प्रतिक्रिया देणार नाही. ते रोज काही ना काही टीव्ही समोर बोलतच असतात.
धनंजय मुंडे संदर्भात जी काही चौकशी सुरू आहे, त्यातून जे समोर येईल. आरोप होत आहेत; म्हणून त्यांना राजीनामा मागता येऊ शकत नाही. आरोप सिद्ध झाल तरच त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असेही धर्मरावबाबा आत्राम यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.